बार्शी – शिष्यवृत्ती परीक्षा २०२५–२६ मध्ये सुयश विद्यालय, बार्शीने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत राज्यभरात दैदिप्यमान यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी या दोन्ही गटांमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
इयत्ता पाचवीच्या राज्य गुणवत्ता यादीमध्ये विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रुती शशिकांत साठे हिने ९०.६६ टक्के गुणांसह राज्यात १५ वा क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता पाचवीतील ५८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.
इयत्ता आठवीच्या राज्य गुणवत्ता यादीमध्ये विद्यालयाच्या तब्बल ७ विद्यार्थ्यांनी मानाचे स्थान मिळविले.
राज्य गुणवत्ता यादीतील गुणवंत विद्यार्थी- प्रथम उर्वीच सचिन दराडे ९६% गुण, राज्यात तिसरा क्रमांक, शौर्य शामसुंदर गवळी ९६% गुण, राज्यात तिसरा क्रमांक, सर्वज्ञ प्रदीप खराडे ९४% गुण, राज्यात आठवा क्रमांक,
*्आ्र्या्आ्र्य्आ्र्या्आ्र्य गणेश कुरुंद ९२% गुण, राज्यात बारावा क्रमांक, तेजस बाळू जाधवर ९२% गुण, राज्यात बारावा क्रमांक, अक्षरात दिनेश ठोंगे ९१.३३% गुण, राज्यात चौदावा क्रमांक, श्रेया विष्णू तांबडे ९१.३३% गुण, राज्यात चौदावा क्रमांक. इयत्ता आठवीतील ६० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.
अशा प्रकारे इयत्ता पाचवी व आठवी मिळून विद्यालयाचे एकूण ११८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरनी असून राज्य गुणवत्ता यादीत ८ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविल्याने सुयश विद्यालयाचा शिष्यवृत्तीचा डंका संपूर्ण राज्यात घुमला आहे.
या अभूतपूर्व यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती वर्गासाठी मराठी विषय श्रीमती रेश्मा बोधले, इंग्रजी श्रीमती अर्चना घोलप, बुद्धिमत्ता श्रीमती सोनाली बोंगाळे आणि गणित श्रीमती वैशाली गाडे यांनी मार्गदर्शन केले.
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती वर्गासाठी गणित श्रीमती विजयालक्ष्मी सुरवसे, मराठी श्रीमती अर्चना माने, बुद्धिमत्ता श्रीमती सोनाली बोंगाळे आणि इंग्रजी श्रीमती सुनिता शेटे यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप, उपमुख्याध्यापक संदीप येवले सर तसेच संस्थापक शिवदास नलवडे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभास अध्यक्ष म्हणून पत्रकार संतोष सूर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक शिवदास नलावडे, प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या मार्गदर्शिका श्रीमती प्रतिभा नलवडे, संस्थेच्या मार्गदर्शिका तथा एसबीआय शाखा व्यवस्थापक श्रीमती माधुरी घोलप उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी संस्थापक शिवदास नलवडे यांनी तातडीने शाळास्तरावर छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित केला. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य व जंगी सत्कार समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
Post Views: 5