बार्शी – येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. सुरज व्ही. केंद्रे यांनी क्रिमिनल बेल अर्ज क्र. ५३३/२०२६ मध्ये महत्त्वपूर्ण आदेश देत आरोपी राहुल विलास जगताप व इतर यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाने प्रथमदर्शनी गंभीर स्वरुपाचे आरोप, तपास सुरु असल्याची बाब तसेच आरोपी जामिनावर सुटल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची व पुराव्यात हस्तक्षेप करण्याची शक्यता लक्षात घेऊन जामीन नाकारला.
या प्रकरणात सरकारतर्फे ॲड. दिनेश देशमुख तसेच मूळ फिर्यादीतर्फे ॲड. पवन क्षीरसागर व ॲड.अक्षय बिडबाग यांनी आरोपींना जामीन देऊ नये, अन्यथा साक्षीदारांवर दबाव येण्याची व तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे ठोस युक्तिवाद न्यायालयासमोर मांडले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व उपलब्ध कागदपत्रांचा विचार करुन न्यायालयाने आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. या आदेशामुळे गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये तपास व साक्षीदारांचे संरक्षण यांना न्यायालयाने प्राधान्य दिल्याचे अधोरेखित झाले आहे.