सोलापूर – येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियम वर उद्या (२६) पासून ‘बीसीसीआय’च्या १९ वर्षाखालील मुलांच्या ४ दिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणजेच कूच बिहार चषक मधील पहिल्या फेरीचा सामना यजमान महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ संघादरम्यान होणार असल्याचे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाचे कालच आगमन झाले असून २४-२५ रोजी सकाळ दुपार अशा २ सत्रात दोन्ही संघांनी कसून सराव केला आहे.
पहिल्याच फेरीचा सामना असल्याने दोन्ही संघाच्या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
या सामन्यासाठी अधिकारी म्हणून पंकज धर्मानी, पंच म्हणून प्रल्हादसिंग रावत, हर्षद रावले, गुणलेखक म्हणून कपिल खरे, केतकी जामगावकर तर व्हिडिओ ॲनालिसिस साठी मयूर कांबळे व गुरुप्रसाद कुडाव हे आणि अँटी करप्शन अधिकारी म्हणून दत्तात्रय गंगावणे हे काम पाहणार असून त्यांचे मदतीला स्थानिक अधिकारी म्हणून चिराग शहा, योगेश कोंपल अमोघ जगताप, प्रसाद शावंतुल व राजवर्धन जिल्हा हे असणार असल्याचे क्रिकेट संघटना सचिव चंद्रकांत रेम्बर्सु यांनी कळविले आहे.
एलीट प्रकारच्या ह्या सामन्यांसाठी महाराष्ट्र सोबत विदर्भ, आंध्र प्रदेश, मणिपूर, झारखंड, मध्य प्रदेश या राज्यसंगांचा समावेश अ गटात करण्यात आलेला आहे.
जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने विविध पदाधिकारी हे या सामन्यासाठी विविध समिती मध्ये कार्यरत असून सामन्याची जय्यत तयारी सुरू आहे.
दोन्ही संघ याप्रमाणे –
महाराष्ट्र : सुवाशिक जगताप (कॅप्टन), प्रज्वल मोरे, अनिश जोशी, एकनाथ देवडे, गुंजन सावंत, वेदांत गोरे, आयुष रकताडे, अनिकेत शिंदे, साई परदेशी, तन्मय माने, विहान बागड, इंद्रजीत शिंदे, अभिनंदन अडक, अद्वैत डेरे, ओम पाटील, हर्षिल सावंत, प्रथमेश वाघमारे, आदित्य दडे.
सपोर्ट स्टाफ – मिलिंद गुंजाळ (मुख्य प्रशिक्षक), डॉमिनिक मुथुस्वामी (गोलंदाजी प्रशिक्षक), दिगंबर वाघमारे (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) डॉ.स्वरूप निंभोरे(फीजिओथेरपिस्ट), लक्ष गुप्ता (S&C प्रशिक्षक), वरून देशपांडे (व्हिडिओ ॲनालिस्ट) राहुल अरवडे (संघ व्यवस्थापक) रोहन कदम (मसाजर), प्रतीक दलाल (साईड आर्मर)
विदर्भ : कुश शर्मा (कॅप्टन) अर्णव लुंगे, सर्वेश इखाणकर, वेदांत धापोडकर, साईश भिसे, आनंद तळे, हिमांशू कावळे, ओम धोत्रे, निहाल मौर्य, वैभव सिंग, यश पाटील, मंथन काळे, आदि बजाज, अक्षत खरे, अर्णव सिन्हा, प्रतीक गंगाधरी .
सपोर्ट स्टाफ – हर्षल पाठक (मुख्य प्रशिक्षक) धर्मेंद्रर अहलावत (सहाय्यक प्रशिक्षक) हर्षल बनिया, आकाश अस्थाना, प्रणव मुकडे, मंदार दावंडे मोहोतशीम अंसारी.
Views: 48