सोलापूर – सकल हिंदू समाज आयोजित भव्य हिंदू संमेलन आरटीओ परिसर, येथे उत्साहाने आनंदाने गुरुवार दिनांक 26 रोजी रामनवमीच्या दिवशी संपन्न झाले. त्या कार्यक्रमात कुटुंब प्रबोधन या विषयावर बोलताना राष्ट्रीय सेवा समितीच्या सौ गायत्री सुमंत यांनी, पंच परिवर्तनाच्या पाच मुद्द्यांचा सविस्तर उल्लेख करून कुटुंबामध्ये भ चे महत्व किती आहे उत्कृष्ट प्रकारे समजावून सांगितले. या कार्यक्रमात, शेकडो नागरिक उपस्थित होते महिलांचा सहभाग जास्त होता.
संमेलना पूर्वी आंबेडकर चौक आरटीओ ऑफिस समोरून, श्रीरामाच्या रथा सोबत भव्य शोभायात्रा निघाली, त्यमध्ये लहान मुले राम लक्ष्मण हनुमान,वेशभूषा मध्ये सर्वांना आकर्षित करून गेले. शोभायात्रा मध्ये डॉक्टर माने, डॉक्टर तर्नल्ली,श्री हेमंत जाधव श्री वडणे श्री वीरेंद्र मुळे आणि डॉक्टर चिलजवार हे सगळे समितीचे सदस्य उपस्थित होते.
वाजंत्री च्या आवाजात आणि भारत मातेच्या जय-जयकारामध्ये, शोभायात्रा आणि स्कूल येथे पोहोचली. तेथे सौ अपर्णा सहस्त्रबुद्धे यांचे भारुड कीर्तन झाले, वंदे मातरम कार्यक्रमाचा समारोप झाला.
यावेळी परिसरातील बरेच मान्यवर आणि महिला मुले उपस्थित होत्या. या संमेलनाचे संयोजन डॉक्टर चिलजवार यांनी आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रीती चिलजवार यांनी केले.
।हिंदूंच्या सकल समाजाचे एकत्रिकरण आणि हिंदुत्वाचे महत्त्व या संमेलनातून आणि समारंभातून, नागरिकांना समजून सांगण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून झाला.


















