अकलूज : येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थी, पदक विजेते खेळाडू यांचा सत्कार समारंभ आणि प्रथम वर्ष स्वागत समारंभ मा. चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
या समारंभात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी पदवीमध्ये सुवर्णपदक विजेती कु. निकिता गोंडाळ, कांस्यपदक विजेती कु. वैष्णवी ससाने, रोहित कदम (मंडल कृषी अधिकारी), विनायक मोरे आणि रवींद्र गायकवाड (सर्कल बेस्ड ऑफिसर), प्रवीण खाडे (बँक शाखाप्रमुख), कु. अनुराधा पाटील (महसूल सहाय्यक) तुषार मस्के (ज्युनिअर असोसिएट), नाना बनसोडे, इत्यादींचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कृषी महाविद्यालय, वडाळा येथे पार पडलेल्या अंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धेत रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने रौप्य पदकाची कमाई केली, त्याबद्दल संघातील सर्व खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. रत्नाई कृषी महाविद्यालयाचे चि.शिवरत्न तळेकर- पाटील आणि चि. प्रवीण भवर यांनी कृषी महाविद्यालय, मिरजगाव येथे पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली, त्यामुळे त्यांनाही सन्मानित करण्यात आले.
रत्नाई कृषी महाविद्यालयाचे 2025 पासून एकूण 105 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शासकीय सेवेत निवडले गेलेले आहेत. त्यांचा सन्मान करावा व सध्याच्या शिक्षण घेत असलेल्या कृषीदूत आणि कृषीकन्यांना प्रोत्साहन द्यावे, या उद्देशाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक मा. श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते- पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर नूतन संचालक चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते- पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.अभिजीत विजयसिंह रणवरे, सहसचिव श्री.हर्षवर्धन दीपकराव खराडे-पाटील, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. वसंत जाधव, श्री. विजय शिंदे, श्री. गणेश निंबाळकर, श्री. शशांक मुंडफने, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या सत्कार समारंभामध्ये संस्थेचे सचिव श्री. अभिजीत रणवरे, यांनी सत्कारमूर्ती आणि उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शैक्षणिक तसेच सांस्कृतिक, कला, क्रीडा, इ. क्षेत्रामध्ये संस्थेचे नाव महाराष्ट्रात तसेच देशपातळीवर उंचविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील तसेच सर्व संचालक मंडळ मार्गदर्शन करत असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रविराज गणेशराव नलावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश माने- देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन मारुती एकतपुरे यांनी केले. या सत्कार समारंभप्रसंगी सत्कारमूर्ती असलेले श्री. रोहित कदम, विनायक मोरे आणि रवींद्र गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
Post Views: 16