Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुलींच वय वाढतय, तिच्या डोक्यात अपेक्षा भरवू नका : भारत वाघमारे 

तरुण भारतbyतरुण भारत
June 1, 2026
in solapur
0
मुलींच वय वाढतय, तिच्या डोक्यात अपेक्षा भरवू नका : भारत वाघमारे 
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : अनेक समाजात मुलींचे प्रमाण कमी असताना आहे त्या मुलींचे विवाह थांबले आहेत. त्यांचे वय वाढत आहे. याला पालकांच्या अपेक्षांचं ओझं जबाबदार आहे. यापुढे तिच्या डोक्यात अपेक्षा भरवू नका, तडजोडीचा मार्ग अवलंबून पुढचे आयुष्य सुखी करा, अशी अपेक्षा रायगडचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी व्यक्त केली.
             चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या वधू-वर परिचय संमेलनात अध्यक्ष म्हणून बोलताना उपजिल्हाधिकारी वाघमारे यांनी वरील अपेक्षा व्यक्त केली. जामगोंडी लॉन्स येथे रविवारी पार पडलेल्या वधू-वर मेळाव्यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, शुभांगी माने, पूर्वा वाघमारे, पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक हरीदास टाणपे, नायब तहसीलदार बालाजी बनसोडे, पाकणी आश्रम शाळेचे संचालक दत्तात्रय शिंदे, प्रमुख निमंत्रक राजशेखर जेऊरकर, मल्हारी बनसोडे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल अंगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
           संत रोहिदास, संत हरळय्या आणि भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. या मेळाव्यात जवळपास ४५० वधू-वर यांची नोंदणी झाली. अतिथींच्या मनोगत कार्यक्रमानंतर हजर असलेले इच्छुक वधू-वर, पालक यांनी परिचय करून देत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. प्रारंभी प्रास्ताविकेतून राजशेखर जेऊरकर यांनी यंदा वधू-वर संमेलनाचे दुसरे वर्ष असल्याचे सांगत संमेलनामागचा हेतू विषद केला. यावेळी अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी संत रोहिदासांच्या विचारावर चाला, बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करा असे सांगत वधू-वर चौकशी करताना संपत्ती नको तर मुला, मुलीचे संस्कार पाहा असा आग्रह धरला.
        यावेळी भारत वाघमारे यांनी आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना अ, ब, क, ड वर्गीकरणाला आक्षेप नोंदवण्याचे सांगितले. या संमेलनासाठी परशुराम शिंदे, रेवणसिद्ध व्हनमराठे, वामन धुळराव, शिवपूत्र हरवाळकर, अंबादास वाघमारे, दत्तात्रय हरवाळकर, शावरप्पा वाघमारे, प्रा. आंबादास चाबुकस्वार, राजेंद्र व्हनकोरे, शिवकुमार तोळणुरे, महादेव कांबळे, संगीता शिंदे, पौर्णिमा धुळराव, सुनिता वनस्कर, सुजाता हरवाळकर, रुपाली बनसोडे, ज्योती बनसोडे़, ज्योती कांबळे, यल्लप्पा व्हनहुवे,  यांच्यासह चर्मकार समाज विकास मंडळाच्या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.
रोहिदासांचे विचार घरा-घरापर्यंत
 पोहोचवा : माधव गायकवाड
यावेळी प्रमुख अतिथी माधव गायकवाड यांनी १३ व्या शतकात संत रोहिदासांनी सर्वप्रथम सथी प्रथेला विरोध केल्याचे सांगत स्त्रीयांना सन्मान दिला, त्यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवा अशी अपेक्षा व्यक्त केली. चर्मकार समाजाची दशा आणि दिशा विषयावर ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर आज समाजाची दशा वाईट असती. शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे. ते मुलांना पाजा. शासकीय सेवेत असताना आपण समाजासाठी किती उपयोगी येतोय विचार करा, महिन्यातला एक रविवार समाजकार्यासाठी द्या, असे आवाहन त्यांनी केले.
Post Views: 42
Previous Post

ना.आठवले यांनी केले हभप.साळुंखे पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन

Next Post

राज्यस्तरीय डायव्हिंग स्पर्धेत सोलापूरला १५ पदके

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
राज्यस्तरीय डायव्हिंग स्पर्धेत सोलापूरला १५ पदके

राज्यस्तरीय डायव्हिंग स्पर्धेत सोलापूरला १५ पदके

ताज्या बातम्या

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026
क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

June 13, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील वीजप्रश्नावर आमरण उपोषणाचा इशारा

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील वीजप्रश्नावर आमरण उपोषणाचा इशारा

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन; भीमानगर चौकात जंगी सत्कार

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन; भीमानगर चौकात जंगी सत्कार

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0908804

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697