
माळशिरस ….. अण्णाकाकांनी केलेले समाजकार्य उल्लेखनीय असून त्यांच्यामुळे सर्वसंस्थाचे रुपांतर वटवृक्षात झाले असल्याचे प्रतिपादन येथील विविध संस्थांचे मार्गदर्शक कै. विष्णुपंत विठ्ठलराव कुलकर्णी तथा अण्णा काका यांच्या १५ व्या पुण्यतिथी निमित्त गोपाळराव देव प्रशालेत रक्तदान, वृक्षारोपण आणि मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ एक के इनामदार यांनी केले
यावेळी, श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष मिलिंद कुलकर्णी,नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण, कार्यवाहक रामचंद्र दोशी, सहकार्यवाह राजाराम ढाले, संचालक संतोष कुलकर्णी, सुभाष शिंदे,धनंजय मस्के, नंदकुमार घाडगे, एम पी कुलकर्णी, डॉ. सुभाष देशमाने,डॉ .सुधीर दोशी ,महादेव देशमुख,प्रवीण बंडेवार,अॅड. आप्पासाहेब वाघमोडे,विश्वास महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यस्मरणानिमित्त शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँकेच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०९ जणांनी रक्तदान केले.मान्यवरांच्या हस्ते समीर गांधी कला महाविद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले. वैद्य महेश कुलकर्णी व वरूण कुलकर्णी यांच्या वतीने मोफत ९४ रुग्णांची मोफत आयुर्वेद चिकित्सा व रोगनिदान तपासणी व उपचार, डॉ. किशोर बागडे यांचे वतीने ४१ रुग्णांची मोफत कान व श्रवणदोष तपासणी उपचार, डॉ.अशोक बागनवर यांचे वतीने ४१ रुग्णांची दंतचिकित्सा तपासणी, करण्यात आली .तसेच विद्यार्थ्यांना शालेय दाखल्याचे वाटप करण्यात आले.
गोपाळराव देव प्रशालेचे मुख्याध्यापक सुर्यकांत जानकर , समीर गांधी कला महाविद्यालयाचे प्रा. देविदास गेजगे, इंग्लिश मीडियमच्या प्रा. अपर्णा इनामदार व मारुतीनाना कुलकर्णी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कांता कांबळे व समन्वयक राहुल राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन काटकर सर यांनी केले.
Post Views: 11