
सोलापूर – अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने समाज कल्याण केंद्र, रंगभवन सोलापूर याठिकाणी वधुवर परिचय मेळावा संस्थेचे अध्यक्ष मीनल ताई दास यांच्या नेतृत्वात अतिशय उत्साहात पार पडला. या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यातून व सोलापूर शहरातून नागरिक सहभागी झाले.या मेळाव्याची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्या परिचय मेळाव्यास संबोधित करत असताना म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अठरापगड जातीचे मावळे होते, शिव शाहू फुले आंबेडकर या सर्वांच्या विचारधारेतून प्रेरित होऊन विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन आज परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिचय मेळाव्या दरम्यान जवळपास 50 मुला मुलींची नावे नोंदवण्यात आली. या मेळाव्यामध्ये मुला मुलींचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या मेळावा प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मीनल दास, शाम कदम, संभाजी भोसले, श्रीधर गोरे, सरोजिनी माकाई, अनिता वाघमारे, संजीवनी सलबत्ते, जयश्री राणसरजे, सुनीता कारंडे, अर्चना अधटराव, प्रकाश कोळी, विशाल साळुंके, रोहित फावडे, शिरीष जगदाळे, विक्रम वानकर, संतोष सुरवसे आदी उपस्थित होते.























