वेळापूर – “लोकनेते कै. सूर्यकांतदादा माने देशमुख यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत अनेक लोकोपयोगी विकासकामे केली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यासाठी समर्पित केले. त्यांचे कार्य आणि जीवनप्रवास आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते पांडुरंगभाऊ माने देशमुख यांनी केले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती लोकनेते कै. सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त वेळापूर येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते पांडुरंगभाऊ देशमुख हे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकनेते कै. सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वेळापूर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक प्रणित कांबळे यांचा पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस सेवेत निवड झालेल्या प्रज्वल धनवटे, कर्तव्य धनवटे आणि सानिका वाडकर यांचाही विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंगभाऊ माने देशमुख,आनंदराव माने देशमुख, हरीश मेटकरी, दत्तात्रय माने, अमरसिंह माने देशमुख आणि अमृतराज माने देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते पांडुरंगभाऊ माने देशमुख, मदनसिंह माने देशमुख, संदीप माने देशमुख, गोपाळ घाडगे आणि हरीश मेटकरी यांनी कै. सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या सामाजिक, राजकीय आणि विकासाभिमुख कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे आवाहनही वक्त्यांनी केले.तसेच लोकनेते कै.सूर्यकांतदादांनी वेळापूर येथे केलेल्या कार्याचा यावेळी उल्लेख कऱण्यात आला यामध्ये दादांचे सहकारी कै.शंकरराव पाटील यांनी दादांच्या सांगण्यावरून पिण्याच्या पाण्याची सोय यासाठी पाच एकर जमीन देण्याची सोय केली,वीज वितरण कंपनीला ट्रस्टची पाच एकर जमीन दिली, शाळा व महाविद्यालयासाठी दादांचे सहकारी कै.केशवरावदादा माने देशमुख यांनी दोन एकर जागा दिली,जनावरांच्या दवाखान्यासाठी श्री पांडुरंग भाऊ माने देशमुख यांनी सात गुंठे जागा दिली. याचा महत्त्वपूर्ण उल्लेख करण्यात आला
या कार्यक्रमास वेळापूर सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब माने देशमुख, माजी संचालक आनंदराव माने देशमुख, पांडुरंगभाऊ माने देशमुख, अमृतराज माने देशमुख, पांडुरंग पनासे, बाळासाहेब धाईंजे, संदीप माने देशमुख, उत्तम मगर, मदनसिंह माने देशमुख, गोपाळ घाडगे, उमेश भाकरे, चंद्रकांत आडत, अॅड. रामचंद्र ताटे, अॅड. दत्तात्रय राऊत, माळी साहेब, राजकुमार बनसोडे, विश्वास वाघे, उमेश बनकर, सुधाकर इनामदार, राहुल माने देशमुख, वीरकुमार दोशी, तात्या काळे, महेश काळे, नितीन चौगुले, बाळासाहेब खपाले, पोलीस पाटील सतीश माने देशमुख, सचिव दीपक माळवदकर, विनायकराव माने देशमुख, धैर्यशील माने देशमुख, भारत माने देशमुख, विश्वजीत माने देशमुख, दत्तात्रय माने, आप्पा आडसूळ, अर्जुन भाकरे, मधुकर इंगळे, ज्ञानेश्वर चव्हाण, मनोहर भाकरे, शिवाजी आडत, ज्ञानेश्वर शिंदे, अशोक साबळे, संजय पनासे, महेश साठे, संभाजी माने देशमुख, गिरीश कुलकर्णी, दीपकराव चव्हाण, प्रवीण माने, सुखदेव जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास कदम पाटील यांनी केले, तर शेवटी वेळापूर सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Post Views: 3