Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

यंदाही १० वी बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी; कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 27, 2024
in maharashtra
0
यंदाही १० वी बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी; कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यंदा ९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळाने पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केला. यंदा १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली.

 

यंदा १० वी बोर्डाच्या परीक्षेस पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४९,३२६ विद्यार्थी या परीक्षेकरता प्रविष्ट झाले होते. यातील १४,८४,४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाच्या निकालाची एक्केवारी ९५.८१ एवढी आहे. मागील १० वी बोर्डाचा वर्षी ९३.२३ टक्के निकाल लागला होता. म्हणजेच, मागील वर्षाच्या तुलने यंदा टक्केवारीत १.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते.

 

यंदाच्या SSC 2024 च्या निकालाची वैशिष्ट्ये :

 

१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण १५६०१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५४९३२६ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४८४४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि निकालाची टक्केवारी ९५.८१ आहे.
२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण २५,७७० पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३२७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १२,९५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ५१.१६ आहे.
३. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २५,८९४ एवढी असून २५,३६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, २०,४०३विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८०.४२ आहे.
४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण ९१४९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९०७८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ८४६५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९३.२५ आहे..
५. इ. १० वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे.. गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९९.०१ %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९४.७३%) आहे.
७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल ९७.२१ % असून मुलांचा निकाल ९४.५६ % आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा २.६५ टक्क्यांनी जास्त आहे.
८. एकूण १८ विषयांचा निकाल १०० टाके लागला आहे.
९. राज्यातील २३,२८८ माध्यमिक शाळांमधून १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ३८२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

विभागनिहाय टक्केवारी आणि टक्केवारीनुसार विभागीय मंडळ क्रमांक :

क्रमांक १ : कोकण : ९९.०१ टक्के
क्रमांक २ : कोल्हापूर : ९७.४५ टक्के
क्रमांक ३ : पुणे : ९६.४४ टक्के
क्रमांक ४ : मुंबई : ९५.८३ टक्के
क्रमांक ५ : अमरावती : ९५.५८ टक्के
क्रमांक ६ : नाशिक : ९५.२८ टक्के
क्रमांक ७ : लातूर : ९५.२७ टक्के
क्रमांक ८ : छत्रपती संभाजीनगर : ९५.१९ टक्के
क्रमांक ९ : नागपूर : ९४.७३ टक्के

Post Views: 79
Previous Post

अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 28 मे ते 12 जुलैपर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्याद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार

Next Post

शेतकऱ्यांकडून विहीरीऐवजी बोअरवेलची मागणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
शेतकऱ्यांकडून विहीरीऐवजी बोअरवेलची मागणी

शेतकऱ्यांकडून विहीरीऐवजी बोअरवेलची मागणी

ताज्या बातम्या

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल #solapurnews #viral

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल

May 25, 2026

मोदींचे ऐकले गुरुपुष्यामृताला बाजारात खरेदीचा आलेख खाली

May 25, 2026

*warning accident scene* ट्रक- कार अपघात ; आठ जखमी

May 25, 2026

चॅम्पियन ॲक्वॅटीक क्लबच्या वतीने जलतरण स्पर्धा संपन्न

May 25, 2026

सुफियानच्या मृत्यूचे गूढ उकलेना #solapurnews

May 25, 2026
कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

May 25, 2026
प्रा. डॉ. आडसूळ यांना राज्यस्तरीय “आदर्श शिक्षकभूषण” पुरस्कार प्रदान

प्रा. डॉ. आडसूळ यांना राज्यस्तरीय “आदर्श शिक्षकभूषण” पुरस्कार प्रदान

May 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0878666

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697