Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 28 मे ते 12 जुलैपर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्याद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 27, 2024
in solapur
0
अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 28 मे ते 12 जुलैपर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्याद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार
0
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दहावीचा निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवसांपासून (ता. २८) इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात होईल. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले असून तिसऱ्या फेरीनंतर विशेष प्रवेश फेरी होईल आणि १५ जुलैपासून अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू होतील, असे त्यांनी सर्व प्राचार्यांना कळविले आहे. अकरावी प्रवेशाच्या अनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व महाविद्यालयांकडून शाखानिहाय प्रवेश क्षमतेची माहिती मागविली आहे.

 

जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालये तथा कनिष्ठ महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ‘यु-डायस प्लस’मधील माहिती ३० सप्टेंबरपर्यंत अद्ययावत करून घ्यावे. मंजूर प्रवेश क्षमता, प्रवेशित विद्यार्थी, ‘सरल’वरील विद्यार्थ्यांची माहिती विचारात घेऊनच राज्य मंडळ इयत्ता बारावीच्या परीक्षेचे अर्ज स्वीकारणार आहे. या सूचनांप्रमाणे कार्यवाही न करणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई होईल, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिला आहे. दरम्यान, दरवर्षी इयत्ता बारावीतील विद्यार्थी विविध कारणास्तव महाविद्यालय बदलून देण्याची मागणी करतात. पण, आता कनिष्ठ महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेत व जागा उपलब्धतेनुसार बारावीत महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही महाविद्यालय स्तरावरूनच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

प्रवेश अर्ज विक्री व अर्ज स्वीकृती २८ मे ते ८ जून प्रवेश अर्जांची छाननी १० ते १५ जूनपर्यंत पहिली गुणवत्ता यादी १८ जून प्रथम गुणवत्ता यादीनुसार प्रवेश १८ ते २५ जूनपर्यंत दुसरी गुणवत्ता यादी २७ जून (२७ जून ते ४ जुलैपर्यंत प्रवेश) तिसरी गुणवत्ता यादी ५ जुलै (५ ते ८ जुलैपर्यंत प्रवेश) विशेष फेरी (एटीकेटीसह) ९ ते १२ जुलैपर्यंत असणार आहे. जिल्ह्यातील काही खासगी क्लास चालक तथा संस्था चालक हे विद्यार्थी व पालकांना विविध प्रलोभने दाखवून इयत्ता अकरावीसाठी प्रवेश निश्चित करीत आहेत. पण, विद्यार्थी व पालकांनी शाळेत प्रवेश निश्चित करण्यापूर्वी त्या शाळेची मान्यता, शैक्षणिक व भौतिक सुविधा, अध्यापक व अध्यापनाचे वर्ग, अध्यापनाचे विषय, प्रवेश क्षमता पाहावे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास जास्त झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

Post Views: 28
Previous Post

खोटा विवाह करुन देऊन एका कुटुंबाची सुमारे सव्वा तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठकसेनी’ टोळीच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

यंदाही १० वी बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी; कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
यंदाही १० वी बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी; कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

यंदाही १० वी बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी; कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

ताज्या बातम्या

बापरे…..जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते #viral #solapurnews

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल #solapurnews #viral

May 25, 2026

गोकुळ शुगर फॅक्टरीच्या नावाने जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल

May 25, 2026

मोदींचे ऐकले गुरुपुष्यामृताला बाजारात खरेदीचा आलेख खाली

May 25, 2026

*warning accident scene* ट्रक- कार अपघात ; आठ जखमी

May 25, 2026

चॅम्पियन ॲक्वॅटीक क्लबच्या वतीने जलतरण स्पर्धा संपन्न

May 25, 2026

सुफियानच्या मृत्यूचे गूढ उकलेना #solapurnews

May 25, 2026
कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

May 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0878723

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697