बार्शी – आज कोणत्याही कलेला राजश्रय नाही, म्हणून प्रतिष्ठा नाही, पूर्वीच्या काळचा तमाशा आणि आजचे तमाशा यांचे स्थितीमध्ये फरक आहे, आज समाज व्यसनाधीन झाला आहे, स्त्री कलावंत असुरक्षित आहेत म्हणून आता
यातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पदमश्री लक्ष्मण माने यांनी लेखक कोंडीबा शंकर गव्हाणे माजी (मुख्याध्यापक ) लिखित ‘कथा नि व्यथा महाराष्ट्रातील लोककलांची’ आणि ‘गीतार्क ‘
(भगवद गीता मराठी सार, अनुवाद ) या दोन पुस्तक प्रकाशन समारंभचे अध्यक्षीय भाषणात केले.
पुढे बोलतांना श्री. माने म्हणाले की, सत्तेत बसलेल्या सत्ताधीशाना कालाकारांचे व्यथाचे काही घेणे देणे नसते.
जी कला स्वतःचे पोट भरु शकत नाही, जीला मान सन्मान नाही ती शूद्र कला असते. आजवरील पन्नास वर्षांचं अनुभव कथन करून भटक्या विमुक्त चळवळी मध्ये केवळ शिक्षणामुळेच क्रांती झाली आहे असे स्पष्ट पणे सांगितले.
अंधाराचे जागी, प्रकाश आले नंतर अंधार नाहीसा होतो तसे अज्ञानाचे जागी ज्ञान दिल्यानंतर अज्ञान दूर होते, असे प्रतिपादन केले.
श्री. गव्हाणे कुटुंबातील एक मुलगा जिल्हाधिकारी आणि दुसरा नामांकित डॉक्टर होतो या बद्दल त्यांनी मनापासून कौतुक केले.
तुम्ही पद, प्रतिष्ठा, पैसा किती मिळवला याला मुळीच महत्व
नाही तर मुलांना उच्च शिक्षण देऊन कसे घडविले यास खूप महत्व आहे आणि हेच काम श्री. व सौ. गव्हाणे वाहिनी यांनी केले म्हणून मी त्यांचे पुढे नतमस्तक होतो, असे भावपूर्ण गौरव उदगार काढले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा बार्शी व कवी कालिदास मंडळ बार्शी यांचे संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन समारंभ आयोजित केला होता.
या दोन पुस्तकं प्रकाशन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बी. वाय. यादव. डॉ. नवनाथ गव्हाणे (ज़िल्हा अधिकारी भरूच, गुजरात),श्री. सदाशिव पडदुणे, उपज़िल्हा अधिकारी सोलापूर,उदयोजक आणि मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संतोषकाका ठोंबरे उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा बार्शी चे अध्यक्ष श्री. पां. न. निपाणीकर,भारतीय आझाद कामगार महासंघाचे राष्टीय कार्याध्यक्ष प्रा. चंद्रहंस गंभीर,
श्री. दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. सतीश सातपुते हे प्रमुख उपस्थिती मध्ये होते.
डॉ. नवनाथ गव्हाणे, ज़िल्हा धिकारी भरूच, गुजरात
हे प्रमुख पाहुणे पदावरून बोलताना म्हणाले की, ” चळवळ अनेकांचे प्रयत्नांनी पुढे जाते, मी जातीय व्यवस्था मानत नाही तो एक अडथळा आहे.शिक्षण आणि सर्वांचे प्रयत्नांनी आदर्श समाज निर्माण करता येतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक श्री. प्रकाश गव्हाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. हरिदास धनगर यांनी केले.
हा प्रकाशन समारंभ यशस्वी करण्यासाठी कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष व साहित्यिक श्री. आबासाहेब घावटे, प्रकाशक श्री. राहुल भालके, डॉ. संदीप गव्हाणे, श्री. राजेंद्र शिंगण, श्री. रामलिंग बरबडे, श्री. विजय कुमार डुरे पाटील, श्री. भीमराव कदम, सौ. सुमन चंद्रशेखर, शारदा पानगावकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सौ. नीता देव यांनी केले.
Views: 9