सांगोला – कर्मवीर गुरुवर्य कै.बापूसाहेब झपके यांच्या १०४ व्या जयंती निमित्त सांगोला महाविद्यालयात प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोगतात डॉ.सुरेश भोसले यांनी सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाच्या स्थापनेतील बापूसाहेब झपके यांचे योगदान अधोरेखित केले. तसेच संगणक विभागातील प्रा.गणेश पैलवान यांनी भारतीय स्वातंत्र्य लढा आणि त्यातील बापूसाहेब झपके यांचे योगदान याबद्दल माहिती दिली. या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र.कार्यालयीन अधीक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती, पुण्यतिथी उपक्रम आयोजन समितीचे प्रमुख डॉ.जमीर तांबोळी, प्रशासकीय कर्मचारी बाबासो इंगोले, शंकर माने यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 5