सोलापूर:येथील सम्राट चौक येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ नगर, लष्कर येथील विचारक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
ग्रामीण व वंचित समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे कर्मवीर अण्णा हे खऱ्या अर्थाने ज्ञानसूर्य होते, अशा शब्दांत यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अण्णांचा स्वावलंबन आणि सामाजिक समतेचा विचार पुढे नेण्याचा संकल्प यावेळी संस्थेने केला.याप्रसंगी विचारक्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज जगधने, सचिव राहुल शिवशरण, सहसचिव कुणाल गाडे, खजिनदार नागसेन बंगाळे, शुभम दावणे, सिद्धांत गायकवाड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















