
सांगोला – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समिती यांच्यावतीने डॉक्टर डबीर चौक, देशपांडे गल्ली, सांगोला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुधवार दि.२७ मे रोजी स्वरध्यास संगीत विद्यालय प्रस्तुत स्वरसंध्या हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच गुरुवार दि.२८ मे रोजी स.९ वा. प्रमुख मान्यवरांच्या व उपस्थितांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. तसचे संध्या.६ वा. डी.जी.देशपांडे सर यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर विचार कार्य आणि प्रेरणा या विषयावरती व्याख्यान व समाजातील गुणवत्त विद्यार्थ्यांचे सत्कार होणार असून त्यानंतर स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी वरील सर्व कार्यक्रमास देशभक्त नागरिकांनी, श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समिती यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
Post Views: 9