अकलूज – ” रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा समजून अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरावंरील हल्ल्याचे व ब्लॕकमेलींगचे प्रमाण सध्या वाढले असल्याने त्याबाबतचे कायदे अधिक कडक करण्यासाठी मी संसदेत आवाज उठविणार असल्याचे खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सांगितले ”
अकलूज आणि परिसरातील नागरिकांसाठी एक अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे, ग्रामीण भागात प्रथमच सर्वसमावेशक ॲस्थेटिक केअर सेंटर सुरू झाले आहे. ‘नाव्या लेझर, कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी आणि प्लास्टिक सर्जरी युनिट’ तसेच ‘ॲपेक्स ओबेसिटी क्लिनिक’ या अद्ययावत वैद्यकीय सुविधांचा उद्घाटन सोहळा खासदार. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. त्यावेळी खा.मोहिते-पाटील पाटील बोलत होते. प्रारंभी दिपप्रजोलन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ. रेवती राणे म्हणाल्या की, “सौंदर्य व स्वतःची काळजी घेणे हे आता केवळ मोठ्या शहरांतील किंवा फक्त उच्चभ्रू लोकांसाठी सीमित नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना आणि विशेषतः महिलांना प्रसूतीनंतर किंवा रजोनिवृत्तीच्या काळात येणाऱ्या अनेक शारीरिक समस्यांवर आता अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक उपचार अकलूजमध्येच पुणे मुंबई च्या मानाने अत्यंत कमी खर्चात उपलब्ध झाले आहेत.”
या अत्याधुनिक सेंटरमध्ये महत्त्वाच्या व विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध असणार आहेत:
लेझर कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी: महिलांच्या खाजगी समस्या, योनीमार्गाचा सैलपणा/कोरडेपणा आणि मेनोपॉजच्या समस्यांवर प्रगत लेझर उपचार.
HIFEM तंत्रज्ञान: शस्त्रक्रियेशिवाय केवळ बसल्या जागी पेल्विक स्नायूंना बळकटी देणारे आणि हसताना/खोकताना होणाऱ्या ‘मूत्र गळती’वर (SUI) प्रभावी उपाय करणारे आधुनिक मशीन तसेच
त्वचारोग व सौंदर्य उपचार: लेझर हेअर रिमूव्हल, अँटी-एजिंग, हायड्राफेशियल आणि केस गळतीवर PRP ट्रीटमेंट.
प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी: हेअर ट्रान्सप्लांट, लिपोसक्शन, टमी टक, आणि स्तनांच्या व चेहऱ्याच्या सर्व प्रकारच्या
आधुनिक लेझर शस्त्रक्रिया तसेच: मूळव्याध, भगंदर, पिलोनिडल सायनस आणि व्हेरिकोज व्हेन्स यांवर विनाटाका लेझर उपचार. आणि
ओबेसिटी (लठ्ठपणा) वाढत्या
वजनावर आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी ‘ॲपेक्स ओबेसिटी क्लिनिक’मध्ये विशेष उपचार होणार असल्याचे डॉ.नितीन राणे यांनी सांगितले
अकलूज मध्ये नव्याने सुरु झालेल्या या अत्याधुनिक उपचारासाठी ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सतीश दोशी , डॉ. विनोद शेटे, डॉ. रेवती राणे, डॉ. विक्रमसिंह गायकवाड ,डॉ. रोहित फडे (सर्जन), डॉ. तेजस्विता राऊत आणि डॉ. नितीन राणे ( संचालक, ॲपेक्स ओबेसिटी) डॉ.अक्षय कुलकर्णी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची संपूर्ण टीम आता रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.
सदर कार्यक्रमास हृदयरोगतज्ञ डॉ. एम.के.इनामदार ,ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ.राजीव राणे , डॉ विद्युत शहा , आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ संजय सिद, होमिओपॅथी संघटनांचे अध्यक्ष डॉ. अभिजीत राजेभोसले , डॉ.मनिष राणे, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर डॉक्टर, पत्रकार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वाचे आभार डॉ.विनोद शेटे यांनी मानले.
Post Views: 13