निवघा बाजार – येथून जवळच असलेल्या उमरी ( भाटेगाव ) या छोट्याशा गावात तशी शैक्षणिक स्पर्धा खूप मोलाची आहे . येथील बहुतांश कुटूंबातील नागरीकांचा प्रमुख व्यवसाय शेती असला तरी ही येथील शैक्षणिक वातावरण हे उल्लेखनियच आहे.
या गावात केवळ ४ थी पर्यंतच शाळा तालुक्या पासून ३० किमी च्या अंतरावर असलेल्या या गावातील नागरीकांनी शैक्षणिक सुविधांचा अभाव कधी जाणवूच दिला नाही उलट जमेल त्या परिस्थितीत आपल्या मुलांना त्यांनी शिकण्यासाठी गावापासून दूर करून शिक्षणाची गंगा कायम प्रवाहीत ठेवली असल्याचे येथील उच्चशिक्षीत नागरीकांकडे पाहून प्रत्येकजन ह्या भावना व्यक्त करताना दिसत असतो .
गावची हीच प्रेरणा घेऊन येथील शेतकरी बाबूराव इंगळे यांचे पुत्र विश्वजीत बाबूराव इंगळे यांनी आपणाला सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहिले त्यासाठी सतत प्रयत्न करत त्यांनी वेळोवेळी भरती साठी परीक्षा दिल्या मात्र त्यांना थोड्या थोड्या अंतराने यशाने हुलकावनी दिली परंतु अपयशाला खचून न जाता त्यांनी गत पाच वर्षापासून ची आपली मेहनत सुरुच ठेवली आणि यंदा पोलीस भरतीची परीक्षा दिली त्यात त्यांना यश मिळाले आणि त्यांची अकोला पोलीस दलात भरती झाली . त्यांच्या निवडीचे स्वागत आणि कौतूक गावकऱ्यांनी जंगी मिरवणूक काढून केले .
विश्वजीत बाबुराव इंगळे निवड: अकोला पोलीस पदी
रँक:20वी,161 जागेतून ओपन कॅटेगरीमधून.
पाच वर्षाच्या अथक संघर्षातून मिळणाऱ्या माझ्या निवडीमागे सर्वांत महत्वाचा हात म्हणजे माझे आईवडील.माझ्या ह्या प्रवासात,छत्रपती शिवाजी महाराज,फुले,शाहू,आंबेडकर यांचे विचार व आईवडिलांचे संस्कार आणि योग्य मार्गदर्शन ही माझ्यासाठी सर्वात मोठी शिदोरी ठरली.तसेच वेळोवेळी मिळणारे आईवडील,शिक्षक,गावकरी मंडळ आणि मित्रमंडळ यांचे मार्गदर्शन व आधार. येणाऱ्या तरुण मुलांना माझे एकच सांगणे आहे की जर माणसात जिद्द,शिस्त,चिकाटी आणि संयम या गोष्टी असतील तर माणूस कुठलेही कार्य सहज पार पाडू शकतो.















