सोलापूर – प्रा. रसूल सोलापुरे संस्था महाराष्ट्र तर्फे देण्यात येणारा *प्रा. रसूल सोलापुरे संस्थेचे साहित्य पुरस्कार २०२६* ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष खाजाभाई बशीर बागवान यांच्या समीक्षण ग्रंथाला जाहीर झाला आहे. त्यांच्या *“सांस्कृतिक सावल्या.. मागोवा मुस्लिम मराठी स्त्री साहित्याचा”* या पुस्तकाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणार आहे. संस्थेच्या अध्यक्ष प्रा. रसूल सोलापुरे यांनी ही माहिती दिली.
खाजाभाई बशीर बागवान यांच्या कार्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे सचिव अय्युब नल्लामंदू, उपाध्यक्ष प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी, ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक शफी बोल्डेकर तसेच सहसचिव अनिसासिकंदर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
“सांस्कृतिक सावल्या” या ग्रंथात मुस्लिम मराठी स्त्री साहित्याचा मागोवा घेतला असून, त्यातून सामाजिक-सांस्कृतिक संदर्भांची सखोल चिकित्सा केली आहे. या अभ्यासामुळे मराठी साहित्य क्षेत्रात नवा दृष्टिकोन निर्माण झाला आहे. सांस्कृतिक सावल्यास जाहीर झालेला हा तिसरा पुरस्कार आहे.



























