सोलापूर -अज्ञात कारणावरून एका 24 वर्षीय तरुणाने राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अक्कलकोट रोड परिसरातील गांधीनगर झोपडपट्टी येथे आज बुधवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली .
नवीन नागनाथ बिर्रु (वय 24 वर्ष, रा. गांधीनगर झोपडपट्टी, सोलापूर) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. आज बुधवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला फासातून सोडवून आई विठाबाई यांनी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Post Views: 7