बार्शी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ विद्यार्थी प्रवेशोत्सव लेझीम पारंपरिक वाद्यांच्या गजरात सजवलेल्या ट्रॅक्टरमधून भव्य प्रभात प्रभातफेरी काढून नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारावर औक्षण करुन स्वागत करण्यात आले. मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच नवागत विद्यार्थी व मान्यवरांच्या हस्ते आंबा, फणस, चिक्कू फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेतील वातावरण आनंददायी, उत्साही झालेचे दिसून आले.
त्यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी नेटके, सरपंच सौ. आश्विनीताई मंडलिक, उपसरपंच सुधीर गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिध्देश्वर जगताप, उपाध्यक्ष सुधीर माने, नितीन मंडलिक, माजी मुख्याध्यापक सुधाकर बडे, माजी सरपंच राकेश मंडलिक, तंटामुक्ती अध्यक्ष शरद गुंड, ग्रामविकास अधिकारी सोनवणे मॅडम तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वीणा कदम व सर्व शिक्षक, ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
बाळासाहेब मुंढे यांनी सूत्रसंचालन केले तर शिक्षक बिनादेवी दरेकर, अभयकुमार कसबे, मनिषा भोसले, रेणुका मुंढे, विद्युत लहाने यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
Post Views: 41