Monday, September 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राजा भाऊंच्या तिकिटासाठी झेडपी अध्यक्षांची मुंबईवारी 

तरुण भारतbyतरुण भारत
June 3, 2026
in solapur
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्यासाठी अनेक कारण असताना, दुसरे कारण देखील तितकेच महत्त्वाचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य हे राजाभाऊ राऊत यांचे खंदे समर्थक मानले जातात. ज्या नेत्याने आपल्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. त्या नेत्याला आपल्या जिल्ह्याचा आमदार बनवणे, ही खुणगाठ अध्यक्ष वैद्य यांनी आपल्या मनाशी बांधली होती. आता नाही तर कधी नाही अशी भूमिका घेत, आपल्या नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी सच्चा कार्यकर्ता कामाला लागला होता. रात्रंदिवस फोनाफोनी गाठीभेटी सुरू झाल्या होत्या.
यादरम्यान भगवंत महोत्सव सुरू झाला.
             भगवंत महोत्सवाला मुख्यमंत्र्यांना बार्शीत आणायचे ही खुणगाठ मनाशी बांधून राजाभाऊ राऊत यांनी कामकाज सुरू केले. त्यांच्या जोडीला अध्यक्ष वैद्य हे देखील सावलीप्रमाणे होते. विधान परिषदेची नुकतीच चर्चा सुरू झाल्यानंतर अध्यक्ष वैद्य आणि तसेच त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर कार्यकर्त्यांना आपला नेता जिल्ह्याचा आमदार व्हावा अशी इच्छा व्यक्त केली गेली. मग काय त्यासाठी अध्यक्षांनी तरुण कार्यकर्त्यांसह अनुभवी ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन आपल्या नेत्याला उमेदवारी मिळवण्यासाठी व्युव्हरचना आखण्यास सुरुवात केली.
             राजेंद्र राऊत यांना विश्वासात घेऊन अध्यक्ष वैद्य तसेच त्यांचे स्वीयसहाय्यक जयसिंग परदेशी यांनी देखील हालचाली सुरू केल्या. उमेदवारीसाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत संपर्क साधण्यास सुरुवात झाली. विशेषतः मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणे त्यांना विश्वासात घेणे हे देखील महत्त्वाचे कार्य या मंडळींनी पार पाडले. त्याचे फलित म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनावर एक वेगळे प्रकारे छाप पाडणे होती. यासाठी सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली. राजाभाऊ असेल तर आमची काय हरकत नाही.. जणू काही हिरवा कंदीलच या नेत्यांनी अनेक कार्यकर्त्यांनी दिला.
      दरम्यान, अपक्ष उमेदवार असताना राजेंद्र राऊत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहकार्य केले होते. त्यानंतर त्यांची जवळीक्ता आणखीन वाढत गेली. याशिवाय मराठा आरक्षणा दरम्यान जरांगे यांना अंगावर घेणे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सरशी झाल्यानंतर बार्शीपासून ते सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करणे. या गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर छाप सोडणाऱ्या होत्या. त्याचे फलित म्हणून अखेर परिचारक यांना तूर्तास बाजूला ठेवून खंदे समर्थक म्हटल्या जाणाऱ्या राजेंद्र राऊत यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
चौकट
सोलापूर विधान परिषदेच्या एका जागेसाठी भाजप पक्षांतर्गत मोठी चुरस निर्माण झाली होती. पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना यापूर्वी भाजपच्या श्रेष्ठींनी उमेदवारी देण्यासंबंधी सकारात्मक विचार केला होता. परंतु मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २०२४ मधील आंदोलनात तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका केली. त्यावेळी बार्शीचे तत्कालीन आ. राजेंद्र राऊत यांनी फडणवीस यांच्या बाजूने भूमिका घेत जरांगेंवर टीका केली होती. परंतु या गोष्टीमुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु सर्व समाजाला धुडकावून मनोज जरांगे तसेच मराठा बांधवांना अंगार घेतले होते. त्यामुळेच राऊत यांनी गेल्या काही वर्षातील छाप सोडलेल्या कामांमुळे ते मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते.
चौकट
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यशामुळे उमेदवारी
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही माजी आ. राऊत यांनी बार्शी बाजार समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आणली. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत विधान परिषद निवडणुकीसाठी संधी दिली आहे. त्याच पद्धतीने आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पुत्राला झेडपीचे अध्यक्ष बनवले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन त्यांचे काम केले. यामुळे आम्ही देखील आमच्या नेत्याला विधान परिषदेचे उमेदवारी मिळवण्यासाठी  बार्शी ते मुंबई असा प्रयत्न केला.
– दीपक वैद्य, अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर
Post Views: 91
Previous Post

रुग्ण महिलेचे दागिने लंपास; बांबू व लाथा बुक्क्यांनी मारहाण

Next Post

टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी १२ जुनला पेन्शन अदालत 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी १२ जुनला पेन्शन अदालत 

ताज्या बातम्या

फडणवीसांच्या लेकींचे व्हिडिओ झाले व्हायरल….एकदा पहाच…. #viral

September 7, 2026

खासदार प्रणिती शिंदेंनी महावितरणच्या कार्यालयातच मांडले ठाण

September 7, 2026

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात #viral #solapurnews #news #latestnews

September 7, 2026

बिना पावती गंठण विकायला गेला आणि सापडला पोलिसांच्या जाळ्यात #viral #solapurnews #news #latestnews

September 7, 2026

आरक्षण मुद्द्यावर पाटलांना हे म्हणाले भुजबळ #viral #marathinews #news #latestnews

September 7, 2026

अधिकाऱ्यांवर अशा भडकल्या खासदार राणावत #viral #news #marathinews

September 7, 2026

उत्तर सोलापूर तालुक्यात ऑर्केस्ट्रा बारवर छापा; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त #viral #solapurnews #news

September 7, 2026
सांगोला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

सांगोला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1172828

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!