आदर्श हॉस्पिटल मधून रुग्ण महिलेचे दागिने लंपास
सोलापूर : दवाखान्यातील स्पेशल रूममधून एका रुग्ण महिलेचे ४० हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना येथील रंगभवन परिसरातील फर्स्ट चर्चच्या परिसरातील असलेल्या आदर्श हॉस्पिटल मध्ये घडली. दरम्यान याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गणपत लालू राठोड (वय ६७ वर्ष, रा. शिवाजी नगर स्टेशन जवळ, अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या पत्नी दि. १५ मे २०२६ रोजी रात्री १० ते दि. १७ मे सकाळी ६.४५ वाजण्याच्या दरम्यान संबंधित हॉस्पिटलच्या स्पेशल रूममध्ये ऍडमिट होत्या. त्यावेळी एका अज्ञात चोरट्याने रूममध्ये प्रवेश करून त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. यात ३० हजाराचे मणी मंगळसूत्र, १० हजाराचे सोन्याचे कानातील ऑप्स, सोन्याची नाकातील नथ असा एकूण ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार चव्हाण हे गुन्ह्याचा पुढील तपासकरत आहेत.
रिक्षा बाजूला काढ म्हंटल्याने बांबू व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण – चौघांवर गुन्हा दाखल
सोलापूर – रस्त्यात लावलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका ४३ वर्षीय व्यक्तीला चौघांनी मिळून लाकडी बांबू व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना
कुमठा नाका भागातील भारत नगर येथे
३१ मे रोजी घडली. दरम्यान या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
समीर सिद्दीकी, रजिया सिद्दीकी, सम्मी सिद्दीकी आणि जमीर सिद्दीकी (सर्व रा. भारत नगर, कुमठा नाका, सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत युसुफ मौला मुल्ला (वय ४३, रा. भारत नगर कुमठा नाका) यांनी फिर्याद दिली असून ते जखमी झाले आहेत.
फिर्यादी यांच्या घरासमोर सिमेंटची ट्रॉली आली होती. त्यामुळे त्यांनी आरोपी समीर सिद्दीकी याला रस्त्यातील रिक्षा काढण्यास सांगितले. याचा राग आल्याने वरील सर्व आरोपींनी एकत्र येऊन फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली आणि लाकडी बांबूने डोक्यात, पाठीवर व हातावर मारहाण करून जखमी केले. तसेच “येथे बांधकाम करू देणार नाही” असे म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार काळे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 13