Friday, June 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अडीच दशके ‘सनातन प्रभात’चे समाज घडवण्याचे कार्य उल्लेखनीय ! – दुर्गेश परूळकर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 20, 2023
in maharashtra
0
अडीच दशके ‘सनातन प्रभात’चे समाज घडवण्याचे कार्य उल्लेखनीय ! – दुर्गेश परूळकर
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

समाजात सत्य विचार रुजवण्यासाठी शस्त्र नव्हे, तर लेखणी हेच प्रभावी शस्त्र आहे. त्यामध्ये असलेल्या सृष्ट विचारांमध्ये दुष्ट विचारांना नष्ट करण्याचे सामर्थ्य असते. लेखणीच्या माध्यमातून मानवाच्या बुद्धीमध्ये चांगल्या विचारांचे रोपन करायचे आणि ते अंत:करणामध्ये पाझरत जाईल, याची काळजी घ्यायची. साधारणपणे कोणतेही नियतकालिक चित्रपटांविषयीची माहिती, ललित लेख अशा विशिष्ट विषयाला वाहिलेले असते; मात्र ‘सनातन प्रभात’च्या वैशिष्ट्यपूर्ण वार्तांकनात मनोरंजनाला प्राधान्य न देता शास्त्र, नैतिकता, धर्म, न्याय, राष्ट्रशिक्षण, सण, उत्सव यांविषयी प्रबोधन केले जाते. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ मागील अडीच दशके समाज घडवण्याचे उल्लेखनीय कार्य करत आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर यांनी केले.

माटुंगा (प.) येथील लक्ष्मीनारायण बाग सभागृह येथे शनिवारी ‘साप्ताहिक सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सनातन संस्थेच्या प्रवक्त्या नयना भगत आणि सनातन प्रभातच्या उपसंपादिका रुपाली वर्तक या वक्त्यांनी सुद्धा यावेळी संबोधित केले. सनातन प्रभातच्या युट्यूब वाहिनीवरून या सोहळ्याचे ‘लाईव्ह प्रसारण’ करण्यात आले.

या कार्यक्रमाचा प्रारंभ वेदमंत्रपठण आणि सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक (सुश्री) सद्गुरू अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाला. ‘साप्ताहिक सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या अंकाचे प्रकाशन वक्त्यांच्या शुभहस्ते यावेळी करण्यात आले. ‘सनातन प्रभात’ची वैशिष्टये सांगणारा विडिओ यावेळी दाखवण्यात आला. सनातन प्रभातचे मुंबई येथील प्रतिनिधी श्री. प्रीतम नाचणकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. ‘सनातन प्रभात’च्या काही वाचकांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. ‘सनातन प्रभात’ कक्ष, विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही याचा उपस्थितांनी लाभ घेतला.

राष्ट्र आणि धर्म यांचे पुनरुत्थानासाठी वैचारिक बैठक सिद्ध करणे हाच ‘सनातन प्रभात’चा केंद्रबिंदू – रुपाली वर्तक, उपसंपादिका, ‘सनातन प्रभात’

आजपासून 25 वर्षांपूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ असा शब्द उच्चारणे, हा जणू अघोषित गुन्हा होता. अशा काळात ‘ईश्वरी राज्य’, ‘हिंदु राष्ट्र’, हे शब्द जर समाजात खर्या अर्थाने कुणी रूढ केले असतील, तर ते ‘सनातन प्रभात’ने ! समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रत्येक अंगाचे आदर्श व्यवस्थापन हिंदु राष्ट्रात अपेक्षित आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रत्येक अंगाचे संरक्षण आणि नंतर त्यांचे पुनरुत्थान करण्यासाठी वैचारिक बैठक सिद्ध करणे हा सनातन प्रभातचा केंद्रबिंदू आहे. ‘साप्ताहिक सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त सनातन प्रभातचे वाचक, वितरक, हितचिंतक, विज्ञापनदाते, हिंदुत्वनिष्ठ आदी सर्वांप्रती कृतज्ञताभावाने आम्ही आभार व्यक्त करतो.

वाचकांचे प्रबोधन करण्यात ‘सनातन प्रभात’चे मोलाचे योगदान ! – नयना भगत, प्रवक्ता, सनातन संस्था

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून अत्याचारी इंग्रज सरकारवर आसूड ओढले होते. आताच्या काळात हिंदु राष्ट्राच्या चळवळीत ‘सनातन प्रभात’ची भूमिकाही ‘केसरी’प्रमाणे म्हणजे एखाद्या सिंहाप्रमाणेच आहे. ‘हिंदु राष्ट्रा’चा विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यामध्ये ‘सनातन प्रभात’चे विशेष योगदान आहे. ‘साधना’ हा मानवी आयुष्याचा महत्त्वाचा पैलू असून साधना कृतीत आणण्यासाठी करायचे प्रयत्न यासाठी वाचकांना ‘धर्मबोध’ करून देणे तसेच राष्ट्र आणि धर्मजागृतीविषयी वाचकांचे प्रबोधन करण्यात ‘सनातन प्रभात’चे मोलाचे योगदान आहे.

Post Views: 94
Previous Post

नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ?

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मा. रतन टाटा यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान केला.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मा. रतन टाटा यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मा. रतन टाटा यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान केला.

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्यासह उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले मतदान

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्यासह उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले मतदान

June 18, 2026
स्वैच्छिक रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे : डॉ. जयकर

स्वैच्छिक रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे : डॉ. जयकर

June 18, 2026
शहर व तालुका वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा

शहर व तालुका वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा

June 18, 2026
प्रशाला क्र. १ कॅम्प येथे प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

प्रशाला क्र. १ कॅम्प येथे प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

June 18, 2026
दि प्रोग्रेसिव्ह हायस्कूल येथे प्रवेशोत्सव उत्सहात साजरा

दि प्रोग्रेसिव्ह हायस्कूल येथे प्रवेशोत्सव उत्सहात साजरा

June 18, 2026
सोलापूर जिल्ह्यातील शरद भोसले पुरस्काराने सन्मानित

सोलापूर जिल्ह्यातील शरद भोसले पुरस्काराने सन्मानित

June 18, 2026
बीपीएमएस पोर्टलवरून टीडीआर प्रमाणपत्रांचे वितरण

बीपीएमएस पोर्टलवरून टीडीआर प्रमाणपत्रांचे वितरण

June 18, 2026
सोलापूरचे चित्रकार डॉ. डग्लस जॉन, रामचंद्र खरटमल यांचा अयोध्यानगरीत कलाविष्कार

सोलापूरचे चित्रकार डॉ. डग्लस जॉन, रामचंद्र खरटमल यांचा अयोध्यानगरीत कलाविष्कार

June 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0919483

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697