Saturday, June 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भारत सरकारच्या अंतरिक सुरक्षा सेवा पदक पुरस्कारात लातूरच्या तिघांचा समावेश

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2023
in marathwada
0
भारत सरकारच्या अंतरिक सुरक्षा सेवा पदक पुरस्कारात लातूरच्या तिघांचा समावेश
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर, दि.26 जानेवारी- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप जमादार यांना भारत सरकारचा आंतरिक सुरक्षा सेवा पदक, तर तीन पोलीस कर्मचार्‍यांना सर्वोत्कृष्ठ दोष सिध्दीचा पुरस्कार जाहिर झाल्याने त्यांचा पोलीस दलातून अभिनंदन होत आहे. लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा बजावल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील 1278 पोलिसांना हे पदक जाहीर झाले आहे. यामध्ये लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप जमादार यांचा समावेश आहे. राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी ही यादी जाहीर केली आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना या अगोदर त्यांच्या सेवेच्या गौरवार्थ राष्ट्रपतींचे शौर्य पदक, पोलीस महासंचालकांचे पोलीस पदक, विशेष सेवा पदक, तर अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांना याआधी विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. गडचिरोली येथे नक्षलविरोधी अभियानामध्ये कार्यरत असताना सोमय मुंडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मरदीन टोला परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षापासून नक्षली चळवळीत सक्रिय असलेला मोस्टवॉन्टेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याला देखील ठार केले आहे. त्यावेळी गडचिरोली येथे नक्षलवाद्याविरुद्ध राबविण्यात आलेल्या ऑपरेशनचे नेतृत्व सध्याचे लातूर जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अत्यंत यशस्वी पणे पार पाडले होते. तब्बल नऊ तास नक्षलवाद्यांशी झुंज देत ही मोहीम फत्ते करून दाखवली होती. विशेष म्हणजे यामध्ये एकही जवान जखमी अथवा शहीद झाला नव्हता. सोमय मुंडे यांनी नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना आतापर्यंत चार पदके मिळाली आहेत. सोमय मुंडे हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी आयआयटी आणि एमटेक ही पदवी संपादन केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाची 2016 ची परीक्षा पास होऊन ते आयपीएस अधिकारी झाले आहेत. सोमय मुंडे यांची पहिली पोस्टिंग औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या ठिकाणी त्यानंतर ए.एस.पी.अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे नंतर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे अपर पोलीस अधीक्षक(नक्षल विरोधी विरोधी अभियान) म्हणून कार्यरत होते. या दरम्यान त्यांनी अनेक धाडसी कारवाया केल्या. मार्च 2021 मध्ये छत्तीसगड परिसरातील अंबुजमाळा येथे नक्षली परिसरात जाऊन त्यांचा अड्डा उध्वस्त करत एन्काऊंटर कारवाई करून मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला होता. जून 2021 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील आटापल्ली येथे धाडसी कारवाई करत 13 नक्षलीना कंठस्नान घातले होते.लातूर जिल्ह्याचे सध्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांनाही आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आमगाव उपविभागात विशेष कार्य केले आहे. डॉ. अजय देवरे हे नाशिक येथील राहणारे आहेत. सन 2010 मध्ये पोलीस उपाधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले. प्रशिक्षणानंतर सांगली येथे प्रोबेशनरी उपाधीक्षक म्हणून म्हणून कार्य केल्यानंतर नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून विशेष कर्तव्य पार पाडले. त्यानंतर संगमनेर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, नाशिक शहर येथे सहाय्यक पोलीस आयुक्त, त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्य पार पाडले आहेत. नक्षलग्रस्त आमगाव उप विभागामध्ये कार्यरत असताना नक्षली भागात विविध उपायोजना करणे, नक्षल विरोधी अभियानामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणे, कसल्याही धोक्याची परवा न करता कर्तव्य पार पाडणे या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने डॉ.अजय देवरे यांना अंतरिक्ष सुरक्षा सेवा पदक जाहीर केले आहे. सध्या लातूर जिल्हा महामार्ग पथकामध्ये प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप जमादार यांनाही अंतरिक्ष सुरक्षा सेवा पदक जाहीर झाला आहे. त्यांनी 2017 ते 20 पर्यंत नक्षल प्रभावित गोंदिया जिल्ह्यात सेवा बजावली आहे.नक्षली परिसरात पेट्रोलिंग, विविध उपाय योजना आणि सुरक्षेसाठी जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा बजावली. पोलिस उपनिरीक्षक संदीप जमादार हे मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका येथील रहिवासी आहेत. 2015 मध्ये ते पोलिस दलात दाखल झाले. उपनिरीक्षक पदाचे ट्रेनिंग आटोपल्यावर त्यांची पहिली पोस्टिंग देगलूर येथे व दुसरी पोस्टिंग नक्षल प्रभावित गोंदिया जिल्ह्यात झाली. 2017 ते 2020 असे तीन वर्षे त्यांनी खडतर सेवा बजावली. 2020 मध्ये लातूर जिल्ह्यात बदली झाल्यानंतर महामार्ग पोलिस ठाण्यात ते कार्यरत आहेत. तर सर्वात्कृष्ठ दोष सिध्दीचे कार्य केल्या बद्दल विवेकानंद पोलीस ठाण्याचे हणमंत कोतवाड, विनोद चलवाड, जी.जी.क्षीरसागर यांचा समावेश आहे. त्याचे लातूर पोलीस दलातून अभिनंदन होत आहे.

Post Views: 120
Previous Post

७४ वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण सोहळा थेट दिल्लीहून…

Next Post

सोलापूर जिल्ह्यात २७ गाईंचे प्राण वाचवून केला प्रजासत्ताक दिन साजरा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूर जिल्ह्यात २७ गाईंचे प्राण वाचवून केला प्रजासत्ताक दिन साजरा

सोलापूर जिल्ह्यात २७ गाईंचे प्राण वाचवून केला प्रजासत्ताक दिन साजरा

ताज्या बातम्या

उमरडमध्ये तरुणांच्या पुढाकाराने स्मशानभूमीची स्वच्छता

उमरडमध्ये तरुणांच्या पुढाकाराने स्मशानभूमीची स्वच्छता

June 5, 2026
शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा आंदोलन करणार !

शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा आंदोलन करणार !

June 5, 2026
एन.जी. ॲकॅडमी क्रिकेट स्पर्धा : गणेश पवार व यश पवार सामनावीर

एन.जी. ॲकॅडमी क्रिकेट स्पर्धा : गणेश पवार व यश पवार सामनावीर

June 5, 2026

शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल पदांच्या १००% भरतीसाठी ८ जूनपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

June 5, 2026
‘एकता महिला मंच: महिलांनी घेतली वृक्ष संगोपनाची सामूहिक शपथ!

‘एकता महिला मंच: महिलांनी घेतली वृक्ष संगोपनाची सामूहिक शपथ!

June 5, 2026
मॉडेल क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत  

मॉडेल क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत  

June 5, 2026
स्थायी समितीची बैठकीत आषाढी वारीच्या तयारीसह विकासकामांवर भर

स्थायी समितीची बैठकीत आषाढी वारीच्या तयारीसह विकासकामांवर भर

June 5, 2026

 ‘एन.जी. रेड’ आणि ‘साऊथ सोलापूर ब्ल्यू’ संघांचे शानदार विजय

June 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0895789

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697