सांगोला – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त सांगोला तालुक्यातील माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्था, वाढेगाव यांच्यावतीने माणनदी काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांना नदीकाठी वृक्षारोपण करण्यासाठी नारळाची रोपे मोफत वाटप करण्यात आली. सदरचा कार्यक्रम वाढेगाव येथील त्रिवेणी संगमावर तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असणाऱ्या ऍड.श्वेता फेणे यांनी संस्थेला देणगी रूपात नारळाची रोपे दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे, उपाध्यक्ष डॉ.विजय जाधव, सचिव डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, वाढेगावचे उपसरपंच शिवाजी दिघे, ग्रा.पं.सदस्य राहुल घोंगडे, कृषी अधिकारी राजेंद्र भांगे, मधुकर चव्हाण, रणजीत कुंभार, सुरेश पाटील, विठ्ठल चव्हाण, संजय दिघे, मुरलीधर महाकाळ, बंडू पवार, दगडू जाधव, निलेश माने, दत्तात्रय जावीर, महेश आठवले उपस्थित होते. डॉ.राजेंद्र सूर्यवंशी यांनी आभार मानले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नदीकाठी वृक्षारोपण करून कृषिदिन साजरा करण्यात आला.
Post Views: 4