सोलापूर – सोलापूर जिल्हा बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी फरहान बागवान, यस्मिता लीला यांची निवड करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ४ जुलैपासून सुरू झालेल्या १६ वर्षांखालील ४१ व्या राज्य चॅम्पियनशीप बास्केटबॉल स्पर्धेत मुले व मुली दोन्ही संघ सहभागी झाले. सोलापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव साकिब शेख शेख यांनी हे संघ जाहीर केले. संघास जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष के. डी. पाटील, उपाध्यक्ष मनोज यलगुलवार, खजिनदार दिनेश सारंगी आणि अभिजित टाकळीकर यांनी शुभेच्छा दिल्या.
संघ : मुली : यस्मिता लीला (कर्णधार), वृष्टी बिनगे, नेहारिका मोने, रुषिता मोने, सीया कांबळे, गागी देशपांडे, वाफिया अतार, आर्या वाघमारे, माही देशमाने, अवणी साबळे, अभिरा तिवारी, संयुक्ता बारंगुळे. प्रशिक्षक -ताबेज शेख.
मुले : फरहान बागवान (कर्णधार), अभिराज तिडके, अबुबकर इनामदार, समर्थ उकले, सुवेज तांबोळी, यश हारबोळे, उमेर जमादार, वेदांत तमशेट्टी, रनविरसिंग गौर, नोमान मुजावर, शशांक सावंतुल, , अंरहत घुर्गे. प्रशिक्षक – नावेद मुन्शी.

















