बार्शी – पैठण कारागृहातून पलायन केलेल्या कैद्याला बार्शी शहर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत पैठण पोलिसांच्या स्वाधीन केला.
आरोपी हा पैठण कारागृहातील कैदी असून त्याचा क्रमांक उ-५७९० आहे. तो २५ जानेवारी रोजी कारागृह परिसरात शेतीचे काम करत असताना सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत फरारी झाला होता. दरम्यान, आरोपी बार्शी शहरात असल्याची गोपनीय माहिती बार्शी शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार तातडीने शोध मोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्याला पैठण पोलीस ठाण्याच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे, पोलीस उपनिरीक्षक अभय माकने, पोहेकों रियाज शेख, प्रवीण साठे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख, राहुल उदार, अंकुश जाधव, अविनाश पवार, वैभव भांगे, प्रल्हाद अकोलवार, अजित शेख, सतीश उघडे, दत्ता सोमवाड आणि सचिन नितनाथ यांनी पार पाडली.
Post Views: 21