नई दिल्ली महाराष्ट्र सदन येथे आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी सशक्त भारत स्वातंत्र्याची ७५ वर्ष आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त यांचे औचित्य साधून दीप कल्याण संस्था व टीम सेनिथ इंटरनॅशनल वूमन राईट्स आंबेस्टर ऑर्गनायझेशन आणि एज्युकेशन फोरम फॉर वूमन जस्टीस अँड सोशल वेल्फेअर यांच्या वतीने सौ. सुरेखाताई लांबतुरे यांना राष्ट्रीय महिला उत्कृष्ठता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी, प्रमुख पाहुणे खासदार सुनीता दुग्गल, माजी मंत्री सुनील भरला, उपभोक्ता आयोगाचे श्री सिद्धेश्वर कानिटकर, पद्मश्री शोभना नारायण, प्रमुख उपस्थिती, महाराष्ट्राचे माजी मंत्री महादेव जानकर, माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, या कार्यक्रमाचे संयजोक टीम जेनिथ इंडियाचे डॉ. मनीष गवई यांनी संयोजन केले.