बार्शी – कृषी उत्पन्न बाजार समितीने वैराग उपबाजार येथे उभारलेले १००० मे.टन क्षमतेचे अत्याधुनिक कोल्ड स्टोअरेज सज्ज झाले असून शेतकऱ्यांनी आपला माल कमी भावात विकण्याऐवजी किंवा फेकून देण्याऐवजी या कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवावा व आपले नुकसान टाळावे, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा हा उद्देश आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीने उभारलेले हे कोल्ड स्टोअरेज वैराग व परिसरातील शेती अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरणार आहे.
वैराग येथील या कोल्ड स्टोअरेजची माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, बाजार समिती सभापती विजय गरड, पंचायत समिती उपसभापती संतोष निंबाळकर, शिवाजी गायकवाड, दिलीप गांधी, झुंबर जाधव, अनिल डिसले, नगरसेवक वैजीनाथ आदमाने, डॉ. देवेंद्र डोके, संजय माळी, रामेश्वर पाटील, यशवंत माने, चेतन काशिद, तुकाराम मोरे, फुलचंद पालखे, बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे व मार्केट कमिटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



















