अक्कलकोट – तालुक्यातील कलकर्जाळ येथे अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या १३ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लक्ष्मी सिद्धाराम कोळी (वय १३) असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी हिने ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्यापूर्वी राहत्या घरी पिकावर फवारणी करण्यासाठी आणलेले विषारी औषध अज्ञात कारणातून प्राशन केले. प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना ५ ऑक्टोबर रोजी पहाटे दीड वाजता तिचा मृत्यू झाला.
याबाबत तिचे वडील सिद्धाराम कोळी यांनी पोलिसांना खबर दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मिठापल्ली करीत आहेत.