Friday, August 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूरात ‘महावॉकेथॉन’ मध्ये 5 हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग  

तरुण भारतbyतरुण भारत
August 21, 2026
in solapur
0
सोलापूरात ‘महावॉकेथॉन’ मध्ये 5 हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग  
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – जलसंधारण दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यात दि. 15 ते 21 ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा समारोप म्हणून आज सकाळी होम मैदान येथे ‘महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेसाठी तब्बल 5 हजार 115 नागरिकांनी नोंदणी केली होती.
हिरवा झेंडा दाखवून महावॉकेथॉनला सुरुवात
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थितांनी जलसंधारणाची सामूहिक शपथ घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून महावॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन म्हणाले, “जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने सुरक्षित भविष्यासाठी पाणी आणि मातीचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पावसाचे पाणी अडवणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पाण्याचे प्रदूषण कमी करणे अत्यावश्यक आहे. जमिनीची धूप व माती वाहून जाणे रोखण्यासाठी शेतांमध्ये तसेच डोंगर उतारांवर बांधबंधिस्ती करावी. जमिनीची धूप कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. आपण ज्या पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे पर्यावरणाचे आरोग्यही जपले पाहिजे. त्यातूनच आपले पुढील भविष्य सुरक्षित राहील.”
‘एक पाऊल पुढे’ या संदेशासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
‘माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकूया. आजची बचत… उद्याचे सुरक्षित भविष्य!’ हा संदेश देत नागरिकांनी या महावॉकेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महावॉकेथॉनचा मार्ग होम मैदान – डफरीन चौक – सेंट जोसेफ विद्यालय – महात्मा गांधी पुतळा – भैय्या चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – सिद्धेश्वर प्रशाला – जिल्हा परिषद पूनम गेट – रंगभवन – होम मैदान असा होता.
लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती
या महावॉकेथॉनमध्ये अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, योगाचार्य विठ्ठल जाधव, कार्यकारी अभियंता रामचंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सप्ताळे, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, सामाजिक संस्था, योग संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले. दयानंद महाविद्यालय, संगमेश्वर महाविद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेहरूनगर माध्यमिक प्रशाला, एन. के. ऑर्किड कॉलेज, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय, स्नेह निकेतन कुमठे प्रशाला आदी शैक्षणिक संस्थांनी या पदयात्रेत सहभाग घेतला.
लकी ड्रॉ आणि सर्वात लहान सहभागी
विशेष म्हणजे, या महावॉकेथॉनमध्ये 2 वर्षांचा सुदर्श वाघमारे आणि 6 वर्षांची अवनी घोडके या चिमुकल्यांनीही सहभाग घेतला.
महावॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रतीक पाकणीकर या युवकाची लकी ड्रॉद्वारे निवड करण्यात आली. त्यांना रोख 3 हजार रुपये, सन्मानचिन्ह व मेडल उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शना नगारे यांनी केले.
                                                              0000
Post Views: 6
Previous Post

लोकप्रतिनधींचा विकासनिधी रोखून जनतेला वेठीस धरणे थांबवा-हेमंत पाटील

Next Post

‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त  ‘ज्येष्ठ नागरिक आदरभाव’ परिसंवाद  ज्ञानसत्र संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त  ‘ज्येष्ठ नागरिक आदरभाव’ परिसंवाद  ज्ञानसत्र संपन्न

‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त  ‘ज्येष्ठ नागरिक आदरभाव’ परिसंवाद  ज्ञानसत्र संपन्न

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्याला मिळाले शासकीय रेखाकला परीक्षेचे मूल्यमापन केंद्र

August 21, 2026
घरामागे गांजाची लागवड; १० किलो गांजा जप्त

घरामागे गांजाची लागवड; १० किलो गांजा जप्त

August 21, 2026

अभय योजनेत ८५५ गाळेधारकांना ५८.८३ लाखांची दंडमाफी

August 21, 2026

चांदापुरी येथील शेतकरी ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना 13 सायकलचे वाटप

August 21, 2026

राखी पाठविण्यासाठी पंढरपूर पोस्ट कार्यालया मध्ये आकर्षक पाकिटे उपलब्ध

August 21, 2026
‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त  ‘ज्येष्ठ नागरिक आदरभाव’ परिसंवाद  ज्ञानसत्र संपन्न

‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त  ‘ज्येष्ठ नागरिक आदरभाव’ परिसंवाद  ज्ञानसत्र संपन्न

August 21, 2026
सोलापूरात ‘महावॉकेथॉन’ मध्ये 5 हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग  

सोलापूरात ‘महावॉकेथॉन’ मध्ये 5 हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग  

August 21, 2026
लोकप्रतिनधींचा विकासनिधी रोखून जनतेला वेठीस धरणे थांबवा-हेमंत पाटील

लोकप्रतिनधींचा विकासनिधी रोखून जनतेला वेठीस धरणे थांबवा-हेमंत पाटील

August 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1099496

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!