नाशिक – दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी, साजऱ्या होणाऱ्या ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘ज्येष्ठ नागरिक आदरभाव’ या विषयावर परिसंवाद ज्ञानसत्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशवाणी वेब रेडीओवर विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनातर्फे विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांची संकल्पना व प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या कल्पक मार्गदर्शक सूचनेनुसार २३ वे ज्ञानसत्र घेण्यात आले. विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रमुख प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी या ज्ञानसत्राचे समन्वयन व सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन यांनी केले.
२१ ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात साजऱ्या होत असलेल्या ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त’ सदर परिसंवाद घेण्यात आला. ज्ञानात्मक समाजनिर्मितीसाठी ज्येष्ठ नागरिकांचे जीवनातील विविध पैलू यश अपायश स्थिरता इत्यादी संचित दायित्वाचा आदरभाव विचाराची प्रगल्भता आणि सन्मान यातून व्यक्त होतो असे प्रतिपादन सर्वच ज्ञानसत्र परीसंवादाकानी केले. त्याच बरोबर सल्लगाराची भूमिका आणि पारंपारिक संवाद आत्मविश्वास इत्यादीचे संचीतही ज्येष्ठ नागरिकांकडे असते त्याचे कुटुंबाबरोबरच समाजानेही लाभ घ्यावेत. या परिसंवादात प्रथम परिसंवादक डॉ . सचिन पोरे यांनी ‘ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व समाजाने घ्यावयाची काळजी’ या विषयावर विचार व्यक्त केले. तर द्वितीय परिसंवादक डॉ. राजेंद्र बगाटे यांनी ‘ज्येष्ठ नागरिकांचे हक्क : सन्मानाची खरी कसोटी’ या विषयावर विचार मांडले तर तृतीय परिसंवादक डॉ. वासुदेव राऊत यांनी ‘ज्येष्ठ नागरिकांचे शिक्षण आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची भूमिका’ या विषयावर विचार मांडले.
हा कार्यक्रम अध्ययनार्थी व श्रोत्यांसाठी https://avc.ycmou.ac.in या विद्यापीठ संकेतस्थळावर कायमस्वरूपी श्रवणासाठी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ दृक्श्राव्य केंद्राचे प्रमुख प्रा. जयदीप निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रसहाय्यक श्री. प्रकाश सापनर, श्री. गिरीश गवळी यांनी तांत्रिक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचा अध्ययनार्थी, शिक्षक, संशोधक तसेच सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यासनप्रमुख प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. दिपक राजगिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.



















