बार्शी – श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि., बार्शी शाखा-परंडा यांच्यावतीने संस्थेचा ९ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
शासकीय विश्रामगृहासमोर असलेल्या परंडा शाखेच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना युवा नेते विश्वजीत पाटील यांच्या हस्ते श्री भगवंताच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले. वर्धापन दिनाचे औचित्य साधून सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सर्व सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांसाठी चहापान व अल्पोपहाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या ९ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत श्री भगवंत मल्टीस्टेटने आपल्या विविध आकर्षक व पारदर्शक आर्थिक सेवांच्या माध्यमातून सभासद व ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. या प्रगतीमध्ये सभासदांचे योगदान मोलाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधून संस्थेच्या आगामी योजना आणि भविष्यातील वाटचालीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या वर्धापन दिन सोहळ्यास परिसरातील राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून संस्थेला शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना युवा नेते विश्वजीत पाटील, माजी नगरसेवक रईस मुजावर, नगरसेवक सोमनाथ अलबत्ते, उस्मानाबाद जनता बँकेचे व्यवस्थापक संजय बिराजदार, शिवाजी देशमाने, खातेदार बागवान, इकबाल खलील, लक्ष्मण गायकवाड, संतोष भारती, गणेश पाटील, ॲड. तानाजी वाघमारे, प्रशांत पाटील, महावीर करळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच संस्थेचे सचिव प्रदीप औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कांबळे, वैराग शाखाधिकारी नवनाथ भोसले, पांगरी शाखाधिकारी अक्षय नलगे, परंडा शाखाधिकारी गणेश गायकवाड यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी, कर्मचारी, खातेदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी परंडा शाखेच्या उत्तम सेवेबद्दल कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post Views: 4