Saturday, September 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भारताकडे जागतिक स्तरावर तिसरी सर्वांत मोठी स्टार्टअप परिसंस्था – डॉ जितेंद्र सिंह

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 11, 2024
in india
0
भारताकडे जागतिक स्तरावर तिसरी सर्वांत मोठी स्टार्टअप परिसंस्था – डॉ जितेंद्र सिंह

The Minister of State (Independent Charge) for Science & Technology, Prime Minister?s Office, Personnel, Public Grievances & Pensions, Atomic Energy and Space, Dr. Jitendra Singh addressing a press conference on Nine Year Achievements of Ministry of Personnel, Public Grievances and Pensions, in New Delhi on June 09, 2023.

0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आज भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आला आहे. जागतिक नवोन्मेष निर्देशांकात आपण 2014 मध्ये 81 व्या क्रमांकावर होतो, आपण 41 स्थानांनी झेप घेतली असून आज आपण जगात 40 व्या क्रमांकावर आहोत. भारताकडे जागतिक स्तरावर तिसरी सर्वांत मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे आणि इथे सर्वांत वेगाने वाढणारे युनिकॉर्न आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

नवी दिल्लीत टाइम्स समूहाने आयोजित केलेल्या ‘द बिग शिफ्ट – मेजरिंग द फोर्सेस ऑफ चेंज’ या जागतिक व्यापार शिखर परिषदेला संबोधित करत होते. 2014 मध्ये भारतात केवळ 350 स्टार्टअप्स होते. आज त्यात 300 पटीने वाढ झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया’ अशी घोषणा दिल्यानंतर आणि 2016 मध्ये विशेष स्टार्टअप योजना आणल्यानंतर, आज आपल्याकडे 1,30,000 स्टार्टअप्स आहेत आणि 110 हून अधिक युनिकॉर्न आहेत,” असे ते म्हणाले.

“नाजूक 5” ते “अव्वल 5” अर्थव्यवस्थेपर्यंतचा गेल्या दहा वर्षांचा भारताचा हा प्रवास एक संशोधनाचा विषय आहे, जो अर्थशास्त्राच्या कोणत्याही विद्यार्थ्याला आकर्षित आणि उत्साही करेल. भूतकाळातील उपहासवृत्ती आणि घोटाळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मागील दशक हे संदिग्ध वेगळेपण जाणून घेण्याची संधी असून निराशावादाकडून आशावादाकडे प्रवासाची ही सुरुवात आहे, असे ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत भारताने विविध जागतिक मापदंड आणि सार्वत्रिक मानकांमध्ये वेगाने वाढ केली आहे. देशात प्रतिभावंतांची कधीच कमतरता नव्हती, मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सक्षम वातावरण तयार झाले, असे सिंह म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी हाती घेतलेल्या अंतराळ सुधारणांमुळे भारताचे अंतराळ क्षेत्र खुले झाल्यामुळे , सामान्य जनतेला चांद्रयान-3 आणि आदित्य सारख्या प्रमुख अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणाचे साक्षीदार होता आले. चार-पाच वर्षांपूर्वी आमच्याकडे अंतराळ क्षेत्रात फक्त एक स्टार्टअप होता, आज हे क्षेत्र खुले झाल्यानंतर आपल्याकडे सुमारे 190 खाजगी स्पेस स्टार्टअप्स आहेत तर याआधीचे स्टार्टअप आता उद्योजक बनले आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत खाजगी स्पेस स्टार्टअप्सनी 1,000 कोटीहून अधिक गुंतवणूक केली आहे असे ते म्हणाले.

आपला अंतराळ संशोधन कार्यक्रम 1969 साली सुरू झाला , ज्या वर्षी अमेरिकेने चंद्रावर प्रथमच मानवाला उतरवले होते. मात्र त्यानंतर आपण अंतराळ क्षेत्रातील प्रमुख राष्ट्रांच्या बरोबरीने आपली कामगिरी उंचावली. आणि गेल्या वर्षी चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात अलगदपणे उतरून इतिहास घडवला , जेथे यापूर्वी कोणीही उतरले नाही.

भारताच्या भविष्यातील आर्थिक वाढीला जैवतंत्रज्ञान चालना देईल असे सांगत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणाले की, सध्या आपल्या जैव-अर्थव्यवस्थेचे मूल्य जवळपास 140 अब्ज डॉलर्स आहे जे एक दशकापूर्वी 10 अब्ज डॉलर्स होते. आज देशात 6,300 पेक्षा जास्त बायोटेक स्टार्टअप्स आणि 3,000 हून अधिक ॲग्रीटेक स्टार्टअप आहेत असे ते म्हणाले.

“आपल्याकडे भारतात विपुल जैव संसाधने आहेत, – हिमालयात, वनौषधी, अरोमा मिशन नवीन संधी निर्माण करत आहे तर 7,500 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीच्या किनारपट्टीवर समुद्रातील प्रचंड संपत्तीचा वापर करण्यासाठी डीप ओशन मिशन सुरू करण्यात आले आहे,” असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

“अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन” वैज्ञानिक संशोधनात मोठ्या सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलचा मार्ग मोकळा करेल असे सांगून डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की एनआरएफ हे अमेरिकेच्या एनआरएफपेक्षा चांगले मॉडेल असेल.

“एनआरएफ तरतुदीत पाच वर्षांत 50,000 कोटी रुपये निधी उभा राहील अशी अपेक्षा आहे , त्यापैकी सुमारे 60%-70%, बिगर -सरकारी स्त्रोतांकडून येण्याचा अंदाज आहे,” असे ते म्हणाले.

एककेंद्रीपणाचा काळ आता संपला आहे याचा पुनरुच्चार करत, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, एनआरएफ सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील एकात्मतेला चालना देईल आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 च्या शिफारशींनुसार देशात वैज्ञानिक संशोधनाची उच्च-स्तरीय धोरणात्मक दिशा प्रदान करेल.

नवोन्मेषक, संशोधन आणि विकास आणि स्टार्टअपसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. पंतप्रधान मोदी यांनी योग्य परिसंस्था दिली आहे जी नवोन्मेषाला पूरक आहे आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देते आणि उद्योगाच्या भरभराटीला अनुकूल आहे.

पंतप्रधान मोदी यांनी भूतकाळातील आपण स्वत:हून लादलेल्या बेड्यांपासून आपली सुटका केल्याचा उल्लेख करून डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, सरकारने सुमारे 2,000 जुने कायदे रद्द केले आणि अर्थव्यवस्था नियंत्रणमुक्त केली, जे पूर्वी थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि वाढीला चालना देण्यासाठी हानिकारक ठरले होते.

आज जग भारताच्या नेतृत्वाचे कौतुक करत आहे, असे सांगत डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, हरित ऊर्जा आणि शून्य उत्सर्जन आणि गेल्या वर्षी जी 20 शिखर परिषदेदरम्यान जागतिक जैवइंधन आघाडी सुरु करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या पुढाकारामुळे आपण हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जगाला अधिक बळ देत आहोत.

जग आज भारताकडे नेतृत्वाच्या आशेने पाहत आहे असे सांगून डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, आजचे युवक हे पंतप्रधान मोदींच्या “विकसित भारत” @2047चे शिल्पकार असतील.

Post Views: 103
Previous Post

तृणधान्य नियमित आहारात, आरोग्य नांदेल घराघरात

Next Post

धामणगाव तालुक्यात गारपीट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
धामणगाव तालुक्यात गारपीट

धामणगाव तालुक्यात गारपीट

ताज्या बातम्या

सोलापुरात गाजतोय दत्तनगरचा रामेश्वरम मंदिर आणि आप्पा गणपती काशी विश्वनाथ मंदिर देखावा

September 19, 2026

गौराईच्या आरासाला दूध भेसळमुक्तीचा मुंढे पॅटर्न,बारा ज्योतिर्लिंग आणि केरळचा देखावा

September 19, 2026

वडेडेटीवार म्हणाले जरांगेनी समझोता केला #viral #marathinews #news

September 19, 2026

आता वादाला वळण ..वडील म्हणाले भाग्यश्रीने माफी मागायला हवी #viral #marathinews #news

September 19, 2026

गौरी पूजनासह महानैवेद्याचा थाट; घराघरांत भक्तिमय वातावरण #viral #solapurnews #aajsolapur #latestnews

September 18, 2026

कंदलगावात दोन घरांवर दरोडा; सहा लाख दहा हजारांचा ऐवज लंपास #viral #news #marathinews #solapurnews

September 18, 2026

गणेशोत्सवात रेल्वे प्रवाशांना फटका #viral #solapurnews #news #marathinews

September 18, 2026

सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेसाठी २४० कोटींचा निधी #viral #solapurnews #marathinews

September 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1232994

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!