Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आमदार राजेश पवार घेणार शेतकऱ्यांच्या हितांचा मोठा निर्णय!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 1, 2024
in top news
0
आमदार राजेश पवार घेणार शेतकऱ्यांच्या हितांचा मोठा निर्णय!
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*आमदार राजेश पवार घेणार शेतकऱ्यांच्या हितांचा मोठा निर्णय!*
*[मतदार संघात साखर कारखाना काढण्यासाठी जागा पाहणी सुरू!

उमरी ( प्रतिनिधी ) नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे आता आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता असून अगदी तंतोतंत सहकार तत्त्वावर चालणारा व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देणारा मोठा साखर कारखाना सुरू करण्यासाठी जागा पाहणी चालू केल्याचे विश्वसनीय वृत्त असून त्या पार्श्वभूमीवर मात्र तथाकथित मंडळींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आमदार राजेश पवार हे धाडसी निर्णय घेऊन त्या निर्णयाची पूर्तता करणारच अशी ख्याती अख्या नायगाव मतदारसंघात पसरली आहे. नायगाव मतदार संघातील तिन्ही तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र, गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूने पसरलेले सुपीक खोरे, भारतभर जोडणारी दळणवळण यंत्रणा, वीज, पाणी, रस्ते, आदी कारखानदारीसाठी असलेल्या अनुकूल गोष्टी आमदार राजेश पवार यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत!
पश्चिम महाराष्ट्र हा सहकार तत्वावर साखर कारखान्यासहित वेगवेगळे उपक्रम अगदी प्रामाणिकपणे राबवून अग्रेसर राहिला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वांनीच सहकार तत्वे प्रामाणिकपणे अमलात आणल्यामुळे भरभराट झाली.

पण मराठवाड्यात जे काही साखर कारखाने चालू आहेत आणि बंद पडलेले आहेत ते निव्वळ तथाकथित मंडळींना चरण्यांचे कुरण बनले आहे. त्यातच शेतकऱ्यांची भयंकर लूट होत असते. मनाजोगा ऊसाला भाव मिळत नसतो, भाव मिळाला तर वजनामध्ये काटा मारणे,त्यांच्या बिलांचे पैसे वेळेवर न मिळणे अशा गोष्टी घडत असतानाच या साखर कारखान्यामध्ये राजकारण पण घुसल्या गेले आहे. आम्हाला मतदान केले तरच तुमचा ऊस कारखान्यावर नेवू नाहीतर तो तसाच सडून जाईल अशा धमक्याही जे आज घडीला साखर कारखाने चालू आहेत त्या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांना आलेल्या असल्याच्या बातम्याही प्रकाशित झालेल्या आहेत.

नायगाव मतदारसंघातील तीनही तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र हे कारखान्यासाठी अनुकूल असून सुजलाम सुफलाम आहे आणि या भागातील गोदावरी मनार सारखा साखर कारखाना बंद झाला.त्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. एकंदरीतच उपरोक्त सर्व पार्श्वभूमीवर आमदार राजेश पवार हे साखर कारखाना काढण्यासाठी जागा पाहणी करत असल्याच्या प्रतिक्रिया गेल्या दोन महिन्यापासून येत आहेत.
आज दैनिक देशोन्नतीने थेट त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. आपण खरोखरच साखर कारखाना काढणार का? असा प्रश्न विचारला असता होकार किंवा नकार न देता पश्चिम महाराष्ट्रा प्रमाणे सहकार तत्वावरील साखर कारखानेच नव्हे तर अनेक उपक्रम आपण प्रामाणिकपणे आपल्या मतदार संघात राबवू, त्यामध्ये शेतकऱ्यांनाही भागीदारी देऊ आणि सहकार तत्वावरील साखर कारखाना कसा असतो, त्यामुळे आपल्या भागाचा विकास कसा होतो,

प्रत्येक शेतकऱ्यांचे जीवनमान दिवसागणिक कसे उंचावते हे आपण दाखवणारच आहोत अशा प्रतिक्रिया देत अनुकूल जागा मिळताच आपण कुठलीही हयगय न करता साखर कारखाना बांधणी चालू करणार असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.
आमदार राजेश पवार हे खरोखरच असे धाडसी निर्णय घेतात व ते सत्यात उतरतात हे मतदारसंघाले पाहिले असल्यामुळे त्यांच्या उपरोक्त निर्णयामुळे तथाकथितां मध्ये एकच खळबळ उडाली असून मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये मात्र एक आश्वासक विश्वासक वातावरण निर्माण होत आहे.

नायगाव मतदार संघ परिक्षेत्रात नवीन साखर कारखाना टाकण्यासाठी मार्गदर्शन व जागा अवलोकन करण्यासाठी साखर कारखाना उभारणीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या कंपनी ची एक टीम आमदार राजेश पवार यांनी मतदार संघात सर्वेसाठी नेमली असून गेल्या दोन महिन्यापासून त्या तज्ञ टीमचे सर्वे चालू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

Post Views: 8
Previous Post

उमरीत पाच ऑगस्टपासून आचार्य गजेंद्र चैतन्यजी महाराज यांची शिवमहापुराण कथा

Next Post

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद शाळा बाणेगाव येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद शाळा बाणेगाव येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद शाळा बाणेगाव येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

ताज्या बातम्या

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

युवा पॅंथर संघटनेच्या वतीने नूतन महापौर उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला.#सोलापूर #महानगरपालिका

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679731

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697