लोहा..
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक संलग्नित नारायणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय लोह्याच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेव योजना अंतर्गत श्रमदानाने राष्ट्रपुरुष,स्वातंत्र्य सैनिक यांच्या पुतळे परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.
कविकुलगुरू कालीदास संस्कृत विस्वविद्यालय रामटेक अंतर्गत लोहा शहरातील शिवाजी चौकातील नारायणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय असुन या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम राबवला या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकानी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून स्व. शांतिदुत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यान व हुतात्मा स्मारक कंधार येथील परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्मारकाना पुष्प अर्पण केले
त्याच बरोबर जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै. भाई केशवरावजी धोंडगे यांच्या स्मारक व परिसराची स्वछता करून पुष्प अर्पण केले याचबरोबर राष्ट्रपुरुष वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्याचा संकल्प विद्यार्थी संकल्प केला या राष्ट्रीय सेवा योजना श्रमदान मोहिमेत नारायणा प्रसाकिय सेवा महाविद्यालयातिल प्राचार्य शिवाजी केंद्रे, प्रा. प्रवीण मुंडे, प्रा. महेश टाकणखार, प्रा. नबील नवाब, प्रा. रितेश बोरोळे तसेच सुमन केंद्रे मॅडम व कांता केंद्रे मॅडम सोबतच महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न केला.