Wednesday, July 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

समाजाचे दर्पण म्हणजे भारतीय साहित्याचे निर्माते प्रेमचंद होत – प्रा अनिल चवळे

तरुण भारतbyतरुण भारत
November 4, 2025
in maharashtra
0
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


लातूर / उदगीर – साहित्यातील वास्तववाद, सामाजिक जाण, स्त्रियांची अवस्था, शेतकऱ्यांचे दु:ख, गरिबी, शोषण आणि मानवी संवेदनांचे सजीव चित्रण करत आपल्या साहित्यातून समजभान अत्यंत प्रभावीपणे उलगडणारे मुंशी प्रेमचंद हे भारतीय साहित्याचे निर्माते असून यांचे साहित्य म्हणजे समाजाचे दर्पण आहे. असे मत प्रा.अनिल चवळे यांनी व्यक्त केले.

चला कवितेच्या बनात उपक्रमांतर्गत आयोजित ३४८ व्या वाचक संवाद मध्ये अहमदपूर येथील पर्यावरणवादी कवी प्रा.अनिल चवळे यांनी भारतीय साहित्यातील युगप्रवर्तक कथाकार, कादंबरीकार आणि समाजसुधारक मुंशी प्रेमचंद यांच्या जीवन, विचार आणि साहित्यावर आधारित व साहित्य अकादमी प्रकाशित “प्रेमचंद” या प्रकाशचंद्र गुप्त लिखित आणि चंद्रकांत बांदिवडेकर यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ग्रंथावर अभ्यासपूर्ण विवेचन करताना ते म्हणाले की, मुंशी प्रेमचंद हे उपन्यास सम्राट होते. त्यांनी हिंदी आणि उर्दू दोन्ही भाषांत लेखन केले. उर्दूमध्ये त्यांचे टोपणनाव नवाब राय असे होते.


प्रेमचंदांचे लेखन हे केवळ साहित्य नसून समाजाचे सजीव दस्तऐवज आहे. त्यांनी शब्दांद्वारे न्याय, माणुसकी आणि समतेचा दीप प्रज्वलित केला.
प्रा. चवळे यांनी प्रेमचंद यांच्या कादंबऱ्यांतील सामाजिक संदेश व मानवी संघर्षाचे उदाहरण देत काही प्रमुख कादंबऱ्यांचे वर्णन केले , सेवासदन – स्त्रीजीवन, वेश्यावृत्ती आणि सामाजिक सुधारणा. प्रेमाश्रम – शेतकऱ्यांच्या शोषणाचे वास्तववादी दर्शन, रंगभूमि–औद्योगिक संघर्ष आणि गांधीवादी विचारांचे प्रतिबिंब, निर्मला– बालविवाह आणि स्त्रीशोषणाचा वेध, गबन- मध्यमवर्गीय समाजातील लोभ आणि दिखाऊपणावर टीका.

कर्मभूमि– स्वातंत्र्यलढा आणि सामाजिक जबाबदारी. गोदान– भारतीय शेतकऱ्यांच्या दु:ख, संघर्ष आणि आशेचे अमर चित्रण; ही कादंबरी त्यांच्या साहित्याचा शिखरबिंदू मानली जाते. ईदगाह – लहान हमीद आणि आजीमधील मायेचे कोमल चित्रण. कफन – गरिबी आणि संवेदनाहीनतेचा कडवा वास्तववाद. पूस की रात – शेतकऱ्याच्या आयुष्याची हृदयस्पर्शी झलक. ठाकुर का कुआँ – जातीय भेदभावावर प्रहार. पंच परमेश्वर – न्याय व विवेकाचे तत्त्वज्ञान. दो बैलों की कथा– जनावरांच्या माध्यमातून माणुसकीचे दर्शन. शतरंज के खिलाड़ी –नवाबांच्या विलासी जीवनावर व्यंग,नमक का दरोगा, सद्गति, बूढ़ी काकी–समाजातील नैतिक अध:पतनावर टीका करणाऱ्या या कथावर भाष्य केले.


यावेळी झालेल्या चर्चेनंतर अध्याक्षीय समारोप करताना अशोक नाईक म्हणाले की प्रेमचंद यांचे साहित्य आजही तितकेच वास्तववादी, व्यथा व्यक्त करणारे आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे असून आजही ते तितकेच लागू पडते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रजपाल पाटील यांनी केले. संवादकाचा परिचय गोविंद सावरगावे यांनी दिला तर आभार मुरलीधर जाधव यांनी मानले.
या सोहळ्यास अहमदपूरचे कवी राजसाहेब कदम, शिवमूर्ती‌ भातंबरे, कलावरती भातंबरे, तसेच उदगीर येथील साहित्यप्रेमी आणि प्रेमचंद अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post Views: 244
Previous Post

माधव पवार यांच्या “गरुडभरारीला” ‘शाहीर अमर शेख पुरस्कार’ जाहीर

Next Post

२०४७ ला स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करताना भारत एक विकसित देश असेल : अ‍ॅड. आशिष शेलार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

२०४७ ला स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करताना भारत एक विकसित देश असेल : अ‍ॅड. आशिष शेलार

ताज्या बातम्या

नोडल अधिकाऱ्यांनो टीमवर्क म्हणून काम करा-जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन #viral #marathinews #solapurnews

July 8, 2026

फिफा वर्ल्ड कपमध्ये पराभवानंतर रोनाल्डोचा भावुक निरोप डोळे आले भरून #viral#internationalnews

July 8, 2026

राम मंदिर कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजानी केले स्पष्ट #viral#nationalnews

July 8, 2026

दुधनी येथील मंदिराचा वाद पेटला सचिन कल्याणशेट्टी हे हुकूमशाही करीत आहेत #viral #news #solapurnews

July 8, 2026

आषाढी वारीसाठी उधना ते मिरज दरम्यान 4 अतिरिक्त रेल्वे धावणार

July 7, 2026

लांबोटी येथे चेष्टा मस्करीत मारहाण झालेल्या बिहारच्या तरुणाचा  मृत्यू 

July 7, 2026

नू. म. वि. शिशु शाळेत ‘शिशु शाळा विचार मंच’ अंतर्गत कार्यशाळा संपन्न

July 7, 2026

सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेने सोलापुरात शालेय क्रीडा स्पर्धेस सुरुवात

July 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0964593

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!