सोलापूर : स्वामिनी वाघमारे हिच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी सृजनशील व अनोखा उपक्रम हाती घेतला. स्वामींनीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त येणारा खर्च “मदतीचा हात दुष्काळ ग्रस्तासाठी “या संकल्पनेप्रमाणे धान्य वाटप, गृहोपयोगी साहित्य,त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या दोन पाल्याचा यावर्षीचा येणारा शैक्षणिक खर्च
तसेच एकल अनाथ मुले यांच्यासाठी साहित्य व खाऊ वाटप खारीचा वाटा उचलण्यात आले.त्याचबरोबर अनाथ मुलांना दैनंदिन जीवनापयोगी साहित्य, शालेय साहित्य,खाऊ वाटप देऊन साजरा करण्यात आले.दरवर्षी वाघमारे कुंटूब शैक्षणिक,सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. या अनोख्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
Post Views: 24