सोलापूर: देशाचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार वितरण झाले. यामध्ये सहाय्य व्यसनमुक्ती केंद्राच्या सचिव गौरी प्रसाद जोशी यांचा डॉ. कलाम राष्ट्रदभारणी प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ. कलाम साहित्य संमेलन आणि पुरस्कार वितरण असा दुहेरी कार्यक्रम सोलापुरात झाला, ड्रीम फाउंडेशन, सेवा फाउंडेशन, डॉ. कलाम कौशल्य विकास केंद्र पुणे व ड्रीम आयएएस सेंटर यांच्या वतीने हे संमेलन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला.
गौरी जोशी यांनी सहाय्य व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो रुग्णांना व्यसनमुक्त करून आनंदी जीवनाचा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संमेलन अध्यक्ष तथा वरिष्ठ वैज्ञानिक डीआरडीओ पुणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांनी सूत्रसंचालन केले.