जालना / अंबड – कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., अंकुशनगर, ता.अंबड, जि.जालना चे गळीत हंगाम २०२५-२६ मधील उत्पादीत पहिल्या पाच साखर पोत्यांची पूजा कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार यांचे शुभहस्ते दिनांक ०६/११/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आली.
गळीत हंगाम २०२५-२६ चा शुभारंभ ३१/१०/२०२५ रोजी करण्यात आला असून प्रत्यक्ष ऊस गळीतास दिनांक ०५/११/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता सुरुवात करण्यात आली आहे. दिनांक ०६/११/२०२५ पासून प्रत्यक्ष साखर उत्पादनास सुरुवात झाली आहे.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक दत्तात्रय जाधव, रजियोद्दीन पटेल, कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक, सर्व खाते / विभाग प्रमुख, पीएटुचेअरमन, अधिकारी, कर्मचारी व कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.

















