Tuesday, March 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूर नगरपालिका निवडणूक विठ्ठल परिवार एकत्रित लढविणार : भगिरथ भालके

तरुण भारतbyतरुण भारत
November 8, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – येत्या काळात होणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका विठ्ठल परिवारीतील सर्व नेते मंडळीं एकत्रित येवून सर्वांच्या सहमतीने योग्य उमेदवारांची निवड करुन लढविणार असल्याची माहिती विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा विठ्ठल परिवाराचे नेते भगिरथ भालके यांनी दिली. 

येथील भालके यांच्या कार्यालयात पंढरपूर नगरपालिका निवडणूकी संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवारी (ता.७) दुपारी विठ्ठल परिवारातील नेते मंडळी,ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजिण्यात आलेली होती. त्या बैठकी नंतर माध्यमांशी बोलताना भगिरथ भालके यांनी बैठकी संदर्भात माहिती दिली.

यावेळी माहिती देताना भालके म्हणाले,येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थात नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूका होणार आहेत. त्यासाठी विठ्ठल परिवारातील सर्व नेत्यांना आम्ही एकत्रित येण्याची विनंती केलेली होती. त्या पध्दतीने सर्व नेते मंडळींनी सकारात्मक प्रतिसाद देवून एकत्र येण्याबद्दल सकारात्मकता दाखविलेली आहे. ज्या पध्दतीने आमचे श्रध्दास्थान, आदरणीय माजी आमदार (कै.) भारतनाना भालके यांनी आम्हाला एक शिकवण घालून दिलेली आहे की, कोणताही निर्णय अथवा भूमिका घेत असताना किंवा तो करीत असताना आपल्या सोबत काम करणाऱ्या ग्रामीण, शहरी भागातील वडीलधारी प्रमुखपदाधिकारी, तरुण सहकारी, माताभगिनी असतील पदाधिकारी असतील त्यांच्या कानावरती घालून, त्या संदर्भात त्यांच्याशी विचारविनिमय करुन त्यांची सहमती घेऊनच त्या ठिकाणी निर्णय घ्यावयाचा. यासाठी प्राथमिक पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाला जोडलेली २२ गावे, मोहोळ मतदार संघाला जोडलेली १७ गावांमधील मंडळींची बैठक शुक्रवारी (ता.७) आयोजिण्यात आलेली होती. दरम्यान उद्या शनिवारी (ता.८) माढा मतदार संघाला जोडलेली आणि सांगोला मतदार संघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील प्रमुख गावांमधील प्रमुख पदाधिकारी आणि शहरातील देखील इच्छुक उमेदवार सोडून जे वडिलधारी मंडळी जे भारतनानां पासून विठ्ठल परिवारात खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत अशा प्रमुख मंडळींशी चर्चा करण्यात येणार आहे. त्या नंतर या बाबतीत येत्या दोन दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके यांनी दिली.
———————
( प्रमुख नेतेमंडळींसोबतच आपण असणार : भालके )
पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूकीतील नगराध्यक्षपदाचा उमेदवार तसेच १८ प्रभागातून निवडणूक लढविणारे ३६ उमेदवारां बाबत विठ्ठल परिवारातील प्रमुख नेते मंडळीं जो निर्णय घेतील त्यांच्या बरोबर आपण असणार आहोत असे देखील यावेळी भगिरथ भालके यांनी सांगितले. कारण सर्वांशी विचारविनिमय, चर्चा करुनच योग्य तो निर्णय किंवा भूमिका घेण्याची जी विठ्ठल परिवाराची परंपरा आहे त्या नुसारच कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
—————— 
जी चुकीची माणसे आहेत आणि त्या सत्ता कायमस्वरुपी उध्दवस्त करणार –
यापूर्वी देखील विठ्ठल परिवारात फुट पाडायची, भांडणे लावायची आणि वेगवेगळ्या सत्ता हस्तगत करावयाच्या हे काही मंडळींचे काम होते. पण त्याला आळा घालण्याचे किंवा त्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची भूमिका आदरणीय भारतनाना भालके यांनी त्या काळात घेतलेली होती. तिच भूमिका आम्ही सगळे विठ्ठल परिवारातील प्रमुख मंडळी एकत्रित येऊन घेऊ असा आपणाला विश्वास आहे. या मध्ये जी चुकीचे माणसे आमच्या मध्ये आहेत, जी आमच्या आमच्यात वेगवेगळ्या भूमिका घेऊन फुट पाडण्याचे काम करीत आहेत अशा मंडळींना आम्ही बाजुला करुन नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळींना निश्चितच आम्ही त्यांची जागा दाखवुन देवु असे देखील भगिरथ भालके यांनी सांगितले.
———————–
विठ्ठल परिवारावर प्रेम करणाऱ्या तरुणांना संधी –
या बरोबरच आगामी सर्व निडणूकांमध्ये आम्ही तरुण आणि विठ्ठल परिवारावर मनापासून प्रेम करणाऱ्या विठ्ठल परिवारासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या मंडळींना संधी देणार असल्याचे देखील यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा विठ्ठल परिवाराचे नेते भगिरथ भालके यांनी सांगितले.
———————
मंगळवेढ्या बाबत देखील अशीच भूमिका –

पंढरपूर शहर, तालुक्या प्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीला सामोरे जाताना मंगळवेढा तालुक्या बाबत देखील आमच्या विठ्ठल परिवाराची सर्वांना बरोबर घेऊन, सर्वांशी विचारविनिमय आणि चर्चा करुनच निर्णय किंवा भूमिका घेण्याची अशाच प्रकारची भूमिका असणार आहे असा देखील खुलासा यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके यांनी केला.

Post Views: 65
Previous Post

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यावर कारवाई करा

Next Post

‘वंदे मातरम्’ गीताचा प्रचार व प्रसार करण्याची प्रत्येकाची जबाबदारी : रविंद्र चव्हाण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

'वंदे मातरम्' गीताचा प्रचार व प्रसार करण्याची प्रत्येकाची जबाबदारी : रविंद्र चव्हाण

ताज्या बातम्या

रामभाऊ जोशी हायस्कूल येथे पर्यावरण पूरक होळी संपन्न. #public #solapurnews #marathinews #viral

March 2, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन

March 2, 2026

महास्वच्छतेतून 45 ट्रॅक्टर ट्रॉली कचरा उचलला.

March 2, 2026

डीजेला बगल हलगी, सनई, ताशा, बँडपथक आणि टाळ मृदुंगाचा वापर करकंबची शिवजयंती मिरवणूक.#shivajimaharaj

March 2, 2026

बदनापुरातील भीषण अपघात एक जागीच ठार,दोघे गंभीर जखमी. #acsident

March 2, 2026

आव्हाना ग्रामपंचायतीला भेट; समृद्ध पंचायत राज स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी मार्गदर्शन

March 2, 2026

बिडकीन येथे भव्य हिंदू संमेलन संपन्न. #public #solapurnews #marathinews #hindu

March 2, 2026

सी.व्ही.रमण जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार पुनम चेडे यांना जाहीर. #public #marathinews #viral

March 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0712869

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697