सांगोला – नाझरे ता.सांगोला येथील मान नदीवरील बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया जात असून, अद्याप दरवाजे न बसवल्याने व त्याची गळती सुरू असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. त्यामुळे ताबडतोब दरवाजे टाकून गळती बंद करा व बंधाऱ्याची दुरुस्ती करा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
नाझरे, वझरे, बलवडी या परिसरासाठी हा बंधारा बांधला आहे. आसपासच्या बंधाऱ्याचे दरवाजे टाकले आहेत. परंतु नाझरे येथील दरवाजे न बसवल्याने व गळती न रोखल्याने पाणी दरवाजा मधून चिळकांड्या मारीत आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच दरवाजे न टाकल्याने पाऊस पडून उपयोग काय असा प्रश्न शेतकरी वर्गात केला जात आहे.



















