कुर्डूवाडी – सन 2017 च्या कुर्डूवाडी नगरपालिका निवडणूकीत शिवसेनाना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बहुमताने सत्ता आली.पाच वर्षाच्या कार्यकाळात शहरात तिनशे कोटीचा विकास झाल्याचा दावा सत्ताधारी मंडळीकडून सतत केला जात आहे.मात्र तिनशे कोटीच्या विकासापेक्षा टक्केवारीचा गोंधळासह प्रचंड प्रमाणात झालेल्या भ्रष्ठाचाराचीच चर्चा जोरात झाल्याने पुन्हा सत्ताधारी नगरसेवकासह प्रस्थापथींना कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडून येवू नये म्हणून राष्टृवादी काँग्रेस शरद पवार ,शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची युती झाल्याची सोशल मिडीयामधून माहीती मीळाली.या अगोदरच बहुतांशी तरूण कार्यकर्ते एकवटल्याची चर्चा असून वेगळे समीकरण “एकच मिशन मलिदा गँंग ” न.पा.तुन हध्दपार झाला पाहीजे अशी मोहीमच उघडली असल्याची चर्चा सध्या शहरात जोरात सुरू आहे. या सर्वपक्षीय तरूण कार्यक्रत्यामुळे होवू पाहणा-या नव्या समिकरणाचा फटका राष्टृवादी काँग्रेसला अजित पवार पक्षास बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर शिवसेना उबाटा,भाजपा व राष्टृवादी अजीत पवार पक्ष स्वतंत्रच लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत तिनशे कोटीचा विकास म्हणजे महाराष्टृाची हास्यजत्रेतला विनोदच कुर्डूवाडी शहरात मानला जातो.
मागील आठ वर्षापैकी सुरवातीचे पाच वर्षाच्या नगराध्यक्ष समिर मुलाणी यांच्या काळात तिनशे कोटीचा विकास झाल्याचा दावा सत्ताधारी मडळीसह प्रस्थापीत नेतेमंडळीकडून वारंवार करण्यात आला.या कार्यकाळात झालेल्या विकास कामाचा मोठ्याप्रमाणावर त्रास सर्वसामान्य नागरीकांना झाला.आच्छर्यकारक झालेल्या विकासामध्ये अंदाजे तीन लाख रूपयाचे बांधलेले सौचालय. उपनगराध्यक्ष उर्मिला बागल व नगरसेवक आयुब मुलाणी यांच्या वार्डातील .अशा स्वरूपात बांधलेल्या सौचालयाची खुपच चर्चा व टीकाटीपन्नी नागरीकांनी केली होती.
निकृष्ठ दर्जाचे रस्ते,गटारी, पाईपलाईन यामुळे तर नागरीकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागले होते.शहरातील तरूण वर्गांनी यावर आवाज उठवण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र सत्ताधारी नगरसेवकांनी विशेषता प्रस्थापीतांनी कोणालाही जुमानले नाही. आठ वर्ष जनता सत्ताधा-यांच्या त्रासाला कंटाळली होती. या सर्व सत्ताधारी नगरसेवकांना आत्ता निवडणूकीतून कायमचे न.पा.मधून हध्दपार करण्यासाठी सर्वपक्षीय तरूण कार्यकर्त्यांची वारंवार चर्चा करण्यासाठी बैठका झाल्या.चर्चेचा तपशील अंतीम निर्णयाप्रत आलेला नसला तरी शहरात मतदारवर्गात चालु असलेल्या चर्चेनुसार सत्ताधारी नगरसेवक व प्रस्थापीत नेतेमंडळी शहरातील विकास कामे अतीशय निकृष्ठ दर्जाची करूण मोठ्या प्रमाणावर माया जमवली असून सर्वांनी मलीदा खाल्लेला आहे.
या सर्व मलीदा गँंगला एकदाच धडा शिकवायचा असेल तर विद्यमान एकही नगरसेवक पुन्हा निवडुन आला नाही पाहीजे यासाठी सर्वच पक्षातील तरूण कार्यकर्ते एकवटले आहेत.यासाठी करमाळ्याचे आ.नारायण पाटील व शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष यांच्यातील मतभेद मीटले असल्याचीही चर्चा आहे.हे जर सत्य असेल तर राष्टृवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेद्वार सुरेखा निवृत्ती गोरे यांच्यासह सर्व पार्टीच अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही .सर्वांचाच राष्टृवादी काँग्रेस पक्षापेक्षा विद्यमान नगरसेवकच टार्गेटवर असल्याचे बोलले जात आहे.अशी जर युती होत असेल तर तरूण उमेद्वारांची अँडजष्टमेंट करण्याचीही तयारी आहे.
कुर्डूवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना (धनुष्यबाण ) व शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्ष (तुतारी ) पक्ष एकत्र आणण्यासाठी खासदार धरीशील मोहिते पाटील व आमदार नारायण आबा पाटील यांनी प्रयत्न केले
बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष, तात्यासाहेब गोडगे शिव सेना जिल्हा उपप्रमुख , संभाजी सातव शिवसेना शहर प्रमुख , आनंद टोणपे शिवसेना तालुकाप्रमुख , दत्ताजी गवळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष, लतीफ भाई मुलानी माजी नगरसेवक, शंकर बागल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किसान सेल जिल्हाध्यक्ष, गोविंद पवार,सागर शर्मा, सज्जन दुरापे यावेळी उपस्थीत होते.अशा स्वरूपाचा सोशल मिडीयावर फोटोसह मँसेज फीरत असल्याने सर्वत्र चर्चेला उधान आले आहे.


























