सोलापूर : पार्थ पवार यांनी केलेल्या पुणे येथील महार वतनी जमीन प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भीमशक्ती संघटनेच्या वतीने जुना पुना नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या सर्व प्रकरणांला पार्थ पवार हे कारणीभूत असून त्याची नैतिक जबादारी स्वीकारून अजित पवार यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे , प.म. सरचिटणीस राजा कदम, शहर अध्यक्ष उमेश सुरते, प्रदेश चिटणीस संजय रणदिवे, शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे, महिला शहर अध्यक्ष ज्योती गायकवाड, रमाबाई लालसरे, रुपाली कोळी, युवक अध्यक्ष मयूर तळभडारे, मेजर सुखदेव साबळे, सलीम मुल्ला, प्रकाश सीताफळे, चंद्रशेखर गायगावळी, सोमनाथ होतकर, कीर्ती शिवशरण, प्रकाश बनसोडे, राजा नागटिळक , अशोक नागटिळक, इब्राहिम शेख, रवी चंद्रकर, शशिकांत विरसूर , मिलिंद कांबळे , सचिन सुरवसे, अशोक व्होतकर , छाया इर्केरे , सतीश ढवरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित. होते.
























