मोडनिंब – नव्याने सुरू झालेल्या तिरुपती–पंढरपूर हॉलिडे विशेष रेल्वेला मोडनिंब (ता. माढा) येथे थांबा मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करत जल्लोष केला. ‘गोविंदा गोविंदा’च्या जयघोषात ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी रेल्वे चालकांचा पेढे भरवून सन्मान करण्यात आला.
या नव्या थांब्यामुळे तिरुपती व पंढरपूर या दोन्ही तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवाशांची संख्या वाढणार असून गैरसोय दूर होणार असल्याचे भाजपाचे राहुल गांधी व प्रवाशांनी सांगितले.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, भाजपचे लखन पाटील, विशाल पाटील, किसान मोर्चा सेलचे अॅड. गणेश सुर्वे, शहर अध्यक्ष राहुल गांधी, माजी सरपंच कैलास तोडकरी, महिला अध्यक्ष मनीषा गिड्डे, राहुल केदार, सोमनाथ माळी, संपत महामुनी, रोहन शिंदे, अमोल काटकर, अजय चोपडे, सुरेश जाडकर, नीलकंठ गडधरे, खजूरकर, निचाळ, कुसुम जाडकर, रेपाळ, पवार, सुनील पंडित, नवनाथ मोहिते यासह मोडनिंबकर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी मोडनिंब रेल्वे स्थानकावर लातूर, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, कलबुर्गी आदी गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी सोलापूर येथील विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्धार व्यक्त केला.संपूर्ण परिसर भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेल्वे इंजिनला आरती ओवाळून पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच रेल्वे चालकांचा पेढे भरवून सत्कार करण्यात आला.

















