सोलापूर : सोलापूरच्या मानाच्या श्री सोन्या मारुती युवक गणेशोत्सव मंडळाच्या* सार्वजनिक गणेश मूर्तीला यंदा आकर्षक *डोळ्याची लेन्स* बसविण्यात आली आहे.
ही पवित्र सेवा मंडळाचे सदस्य *अभिषेक उर्फ सोनू मालक राजाभाऊ मंठाळकर परिवाराच्या* वतीने करण्यात आली.
*रविवार दि. 15 ऑगस्ट 2026* रोजी झालेल्या लेन्स प्रतिष्ठापना कार्यक्रमात *चि. प्रसन्नजीत अ. मंठाळकर आणि चि. पुष्कराज अ. मंठाळकर* यांच्या शुभहस्ते शास्त्रोक्त पूजा करून संकल्प विधी संपन्न झाला.
गणेश मूर्तीला *डोळ्याची लेन्स बसवण्याचे कार्य* पुण्याचे प्रसिद्ध गणेश मूर्तीकार *उमेश पवार* यांनी केले त्यावेळी मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले त्यावेळी मंडळाचे आधारस्तंभ, सल्लागार, पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाप्पाच्या तेजस्वी नयनांमुळे मूर्तीला अधिकच आकर्षण प्राप्त झाले असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
*- श्री सोन्या मारुती युवक गणेशोत्सव मंडळ, सोलापूर*