सांगोला – सांगोल्यातील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज व कॉलेजची माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड होते. यावेळी सचिव अंकुशराव गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांनी कॉलेजच्या प्रगतीचा आढावा सादर करत माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून निधी उभा करून सध्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या गोर गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी असे आवाहन केले.
बाबुराव गायकवाड यांनी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गावी आल्यानंतर कॉलेजला भेट देऊन सध्या ज्ञानग्रहण करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढवावा असे आवाहन केले. यावेळी विजय नागणे, शर्विल अंकलगी, संकेत शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, सोनाली गोडसे या विद्यार्थ्यांनी मनोगतात संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड व संचालक मंडळ यांनी सांगोला सारख्या ग्रामीण भागात सुरू केलेल्या या कॉलेजमुळेच आम्ही तंत्रशिक्षण घेऊ शकलो व जीवनात यशस्वी होऊ शकलो अशी भावना व्यक्त केली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी प्रा.गणेश मिसाळ, इंजि.निलेश माने, प्रा.आनंद गायकवाड, प्रा.पृथ्वीराज लिगाडे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.डी.बावचे यांनी केले.


















