बार्शी – युवकांनी आपल्या परिसर स्वच्छते करण्याबरोबर मनाची स्वच्छता राखावी असे आवाहन डॉ. महादेव डिसले यांनी केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने मौजे उपळाई (ठोंगे) येथे विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजयश्री गवळी या होत्या. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. दामाजी भिसे, डॉ. मनोज चिकराम, प्रा. समाधान लोंढे, प्रा. दिव्या बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे डॉ. डिसले म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा विकास बरोबर समाजसेवा करण्याची संधी स्वयंसेवकाना मिळते. आजचा युवक भारताचा विकासाचा स्तंभ असतो, असे ही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. गवळी यांनी नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग नेहमी प्रयत्नशील असतो.
प्रस्ताविक अशलेशा शिंदे हिने केले. सूत्रसंचलन जाहेद आत्तार आणि स्विटी बरबडे हिने तर आभार पायल बारसकर हिने मानले.

















