पंढरपूर – येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस तामिळनाडूच्या कोईम्बतूर येथील रहिवासी असलेल्या सुब्रमणिया शर्मा यांनी भक्तीभावाने पाच लाख रुपये इतकी देणगी अर्पण केली. सदर देणगी समितीकडे सुपुत करण्यात आली आहे.
या प्रसंगी देणगीदार सुब्रमणिया शर्मा यांचा सत्कार मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते करण्यात आला. मंदिराच्या पवित्र कार्यासाठी दिलेल्या या उदार देणगीबद्दल मंदिर समितीच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

















