सोलापूर – मंद्रूप येथील माझी वसुंधरा योजनेच्या पुरस्कार रक्कमेतून लाखो रुपये खर्च करून झाडे लावण्यात आली. ग्रामपंचायतीकडून पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड करण्यात आली. मंद्रूपमधून इतर गावांना जाणाऱ्या रस्त्यांवर झाडे लावून व संरक्षक कवच करून लाखो रुपये खर्ची टाकण्यात आले. दोन महिन्यापूर्वी लावण्यात आलेली झाडे सध्या ग्रामपंचायतकडून पाणी न घातले गेल्यामुळे झाडे वाळून चालली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे .
दोन महिन्यापूर्वी मंद्रूप ग्रामपंचायतकडून मंद्रूप बस स्थानक, नांदणी रोड, भंडारकवठे रोड , हद्दवाढ भागातील इतर रस्ते, स्मशानभूमी ,शाळा, अंगणवाडी व दवाखाना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशी जातीचे वृक्ष लावण्यात आले. पावसाळ्यात झाडे लावल्यामुळे झाडे स्थिर झाले .
मात्र या झाडांना एक महिन्यापासून ग्रामपंचायतकडून पाणी न घातल्यामुळे ती झाडे सध्या वाळून चालली आहेत. त्यामुळे शासनाची कोट्यावधी रुपयांची निधी वाया जात आहे. मंद्रूप ग्रामपंचायतने माझी वसुंधरा योजनेमधून पुरस्कार मिळाला असताना व त्याच पुरस्कार रक्कमेमधील झाडे पाण्याअभावी वाळून जात असल्यामुळे पर्यावरण प्रेमी मधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
























